घरमहाराष्ट्रनागपूरJitendra Awhad : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? बुलढाण्यातील विषबाधा प्रकरणावरुन आव्हाड...

Jitendra Awhad : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? बुलढाण्यातील विषबाधा प्रकरणावरुन आव्हाड आक्रमक

Subscribe

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा या गावी मंगळवारी (ता. 21 फेब्रुवारी) एकादशीनिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादामध्ये भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 450 ते 500 जणांना या जेवणातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई : एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात भगर आणि आमटी खाल्ल्याने 500 लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रुग्णांना दोरी बांधून सलाइन लावण्यात आले. याचा व्हिडीओ ट्वीट करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (Jitendra Awhad Where has my Maharashtra been taken Aggressive over the poisoning case in Buldhana)

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा या गावी मंगळवारी (ता. 21 फेब्रुवारी) एकादशीनिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादामध्ये भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 450 ते 500 जणांना या जेवणातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

सोमठाना येथे घडलेल्या या घटनेनंतर ज्या ग्रामीण रुग्णालयात किंवा प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत होते. तेथील बहुतांश डॉक्टर्स हे गैरहजर होते. ज्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. परंतु, बाधितांची संख्या वाढत चालल्याने बुलढाणा येथून डॉक्टरांचे पथक बोलवण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने अनेकांना जमिनीवरच झोपवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली होती, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. अद्यापही काही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Maharashtra : अतिक्रमण धारकांवर पोलिसांकडून अश्रुधूराच्या नळकांड्या; कुठे घडला प्रकार वाचा?

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांनी साधला सरकारवर निशाणा

लोणार तालुक्यातील सोमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ ट्वीट करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला. आव्हाडांनी त्यांच्या ट्वीटची सुरुवातच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? या प्रश्नाने केली. पुढे पोस्टमध्ये लिहिले की, कोव्हिडच्या काळात असंख्य अडचणी असतानाही आमच्या सरकारने महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था अतिशय सक्षमपणे हाताळली. जगभरात त्याचं कौतुक झालं, पण त्याच्या दोन वर्षातच महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था जीवनमरणाच्या रेषेवर असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : Manoj Jarange : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’

बुलढाण्यात झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर रूग्णांना उपचार देण्यासाठी रूग्णालयाच्या आवारात दोऱ्या बांधून सलाइन लावायची वेळ येणं ही प्रगतीशील महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी बाब आहे. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून या घटनांची दखल घेतली गेल्याचंही कुठे दिसत नाही. असाही आरोप आव्हाडांनी केला आहे. तर काही दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली, त्यानंतर आता लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे विषबाधा झाली आहे. अन्नातून विषबाधेच्या घटना इतक्या सर्रास होण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? याचा सरकारने खुलासा करायला हवा. अशीही मागणी आव्हाडांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -