घरमहाराष्ट्रमालवणमध्ये मविआला धक्का! खरेदी विक्री संघावर भाजप पुरस्कृत पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

मालवणमध्ये मविआला धक्का! खरेदी विक्री संघावर भाजप पुरस्कृत पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

Subscribe

मालवण येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रतिष्ठेच्या बनविलेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सावंतवाडी पाठोपाठ भाजप पुरस्कृत पॅनलने महाविकास आघाडी पॅनलचा सुफड़ा साफ करत एकतर्फी विजय मिळविला.

सर्वच्या सर्व म्हणजे 15 ही जागांवर विजय मिळवित खरेदी विक्री संघावर आपले वर्चस्व राखले. तालुका खरेदी विक्री संपाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज येथील टोपीवाला हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात १२५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. सुरवातीपासूनच भाजप पुरस्कृत पॅनेलामा उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेलमधील संस्था मतदारसंघ कृष्णा चव्हाण (विजयी), राजन गावकर (विजयी), महेश मांजरेकर (विजयी) प्रफुल्ल प्रभू (विजयी), अभय प्रभुदेसाई (विजयी), राजेंद्र प्रभूदेसाई (बिजयी), भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागास प्रवर्ग अशोक तोडणकर (विजयी), इतर मागास प्रवर्ग कृष्णा ढोलम (विजयी), अनुसूचित जाती जमाती सुरेश चौकेकर (विजयी), महिला मतदार संघ- सरोज परब (विजयी), अमृता सावंत (वी) व्यक्ती मतदार संघ विजय ढोलम (विजयी), महेश गावकर (विजयी), गोविंद गावडे (विजयी), रमेश हडकर (विजयी)

- Advertisement -

या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनल मधील संस्था मतदार संघ श्रीकांत बागवे, अरुण भोगले, उदय दुखंडे, सदाशिव महाभोज, विठ्ठ नाईक, व्यक्ती सदस्य मतदार संघ- महेश अंधारी, मनोज डांगे मनोज राऊत, महिला मतदार संघ- साक्षी तुडवे, नीना मुंबरकर, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासप्रवर्ग मेघनाद घुरी, इतर मागास प्रवर्ग- सुभाष तळवडेकर, अनुसूचित जाती जमाती नागेश अटक, व्यक्ती मतदारसंघ संतोष सुबे, देवानंद ने या अपक्षांचा पराभव झाला तालुका खरेदी विक्री संपाच्या संचालक वार्षिक निवडणूक राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेषी केली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहीले होते. यात भाजप पुरस्कृत पॅनेलने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर भाजपच्या पदाधिकान्यांनी एकच जल्लोष केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -