घरताज्या घडामोडीRajysabha : किरीट सोमय्यांना पक्षनेतृत्वाचे बक्षीस? राज्यसभेत खासदारकीची लॉटरी लागणार

Rajysabha : किरीट सोमय्यांना पक्षनेतृत्वाचे बक्षीस? राज्यसभेत खासदारकीची लॉटरी लागणार

Subscribe

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांच्या पोलखोल मोहिमेने गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडले आहे. किरीट सोमय्यांच्या जोरदार अभ्यासाचा परिणाम हा पक्षाला मदतीचा ठरत असतानाच अनेक राजकीय नेत्यांच्या धडकी भरवणारा आहे. तिन्ही पक्षातील नेतेमंडळींविरोधात किरीट सोमय्यांनी उघडलेला मोर्चा पाहता गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. किरीट सोमय्यांच्या गेल्या काही दिवसातील तपश्चर्येचा परिणाम म्हणजे त्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार असे संकेत मिळत आहेत. केंद्रीय पक्ष नेतृत्वाकडूनही तसेच संकेत मिळत आहेत.

राज्यसभेत कोणाच्या जागी मिळणार संधी ?

राज्यसभेच्या भाजपच्या खासदारांपैकी विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ विकास महात्मे यांचा टर्म हा येत्या जुलै 2022 च्या पहिल्या आठवड्यात संपतो आहे. अशावेळी भाजपकडून पुढे येणाऱ्या नावांमध्ये सर्वात आधी येणारे नाव म्हणजे किरीट सोमय्या. किरीट सोमय्यांनी याआधी निवडणूक लढवत खासदारकीचा टर्म पूर्ण केला होता. पण आता पहिल्यांदा किरीट सोमय्या हे राज्यसभेवर जाणार असल्याचे कळते. किरीट सोमय्यांच्या नावासाठी भाजपच्या टॉपच्या दोन नेत्यांचाही होकार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळीच्या भ्रष्टाचाऱाचे केलेले खोदकाम पाहता किरीट सोमय्यांना हे बक्षीसच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचा मुंबईतील कणखर आवाज हा राज्यसभेतून दिसणार हे नक्की. पीयूष गोएल यांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या हे राज्यसभेतही कामगिरी करताना दिसतील अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

शिवसेना भाजपच्या युतीच्या काळात २०१९ च्या निवडणूकीसाठी स्थानिक शिवसैनिकांच्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांच्या खासदारकीचे तिकिट कापण्यात आले होते. त्याचाच राग म्हणून किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांची कागदपत्रांच्या पुराव्यातून पोलखोल केली. त्यामध्ये भावना गवळी असो वा प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उलगडा किरीट सोमय्या यांनी केला. तर नजीकच्या काळातच पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये खासदार आणि शिवसेना प्रवक्ते किरीट सोमय्या यांच्या नजीकच्या व्यक्तीच्या बाबतीतला एक १०० कोटींचा घोटाळा किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला. याआधीच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या निमित्ताने किरीट सोमय्या यांनी केंद्रीय हरित लवादाकडे पाठपुरावा केला आहे. तर मिलिंद नार्वेकर यांनी अपवादात्मक बंगला आधीच जमीनदोस्त केला आहे.


Operation Kirit Somaiya : शिवसेनेला हवाय एक किरीट सोमय्या

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -