Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र आता धर्म आठवला का? हसन मियाँचं काऊंटडाऊन सुरू; किरीट सोमय्यांचा घणाघात

आता धर्म आठवला का? हसन मियाँचं काऊंटडाऊन सुरू; किरीट सोमय्यांचा घणाघात

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कारखान्यावर आज सकाळी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. दरम्यान आज झालेल्या ईडी कारवाईनंतरही सोमय्यांनी पुन्हा मुश्रीफांविरोधात घोटाळ्याचे आरोप करत ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मिना यांच्या चौकशीची मागणी केली आहे. हसन मुश्रीफांनी एकूण 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.

हसन मियाँना आता धर्म आठवतो का?

मुश्रीफांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत सोमय्या म्हणाले की, हसन मियाँना आत्ता धर्म आठवतो का? मी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी, गणेश विसर्जनसाठी जात होतो, त्यावेळी मला त्यांनी थांबवलं तेव्हा त्यांना मुस्लीम धर्म नाही आठवला. पैसे खाताना, भ्रष्टाचार करताना, गोरगरीब शेतकऱ्यांना लुटताना धर्म नव्हता आठवला? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्यांचा जणू पाढाच वाचून दाखवला.

- Advertisement -

पहिला अनिल परब नंतर हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ का एवढी घाई करत आहेत त्यांच्या आधी लाईनमध्ये अनिल परब उभे आहेत, पहिला अनिल परब नंतर हसन मुश्रीफ आणि नंतर अस्लम शेख, असही सोमय्या म्हणाले आहेत.

- Advertisement -

यावर किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, ठाकरे यांच्या माफीया सरकारमधील आणखी एक मंत्री यांच्यावर ईडीची कारवाई सुरु झाली, 158 कोटी रुपये हसन मुश्रीफ यांनी स्वत;च्या परिवाराच्या, मुलाच्या, जावयाच्या कंपनीच्या नावाने घोटाळ्याचे पैसे कोलकत्तामधील अनेक बोगस कंपन्या, शेल कंपन्या या कंपन्यामधून स्वत:च्या कंपनीत घेतले. त्यानंतर हे पैसे सर सेनापती साखर कारखाना यात ट्रान्सफर केले.

आई महालक्ष्मी, कोल्हापूरमधील महालक्ष्मी मातेने आज माझ्यावर आशीर्वाद दिला. मला आठवतंय 28 सप्टेंबर रोजी मी कोल्हापुरात जायला निघालो होतो आणि त्यावेळी हसन मुश्रीफ, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी मला कोल्हापुरला जाऊ दिलं नाही. पण आज महालक्ष्मीनं आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. मी दोन उदाहरणं देतो रजत कंज्युमर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हसन मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात 13 कोटी 85 लाख रुपये आले. हे पैसे आले 2013-14 मध्ये. पण ती कंपनी 2004 मध्येच बंद झाली होती. जी कंपनी अस्तित्वातच नाही, तिथून ते मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात येतात. तिथून ते साखर कारखान्याच्या खात्यात जातात. माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 24 कोटी 75 लाख रुपये, ही कंपनीही कधीच बंद झालेली, याच कंपनीच्या नावानं बँक अकाउंट उघडण्यात आलं. हसन मुश्रीफ रोख पैसे देतात. त्याच पैशाचा चेक बनवून कुटुंबीयांच्या खात्यात जमा होता.”


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -