घरठाणेएमएमआरडीएच्या कारवाईत कोनगावचे नेक्सा शोरूम जमिनदोस्त

एमएमआरडीएच्या कारवाईत कोनगावचे नेक्सा शोरूम जमिनदोस्त

Subscribe

एमएमआरडीएने नेक्साला दोन वेळा नोटीस बजावली होती

कल्याण । कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगावत उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी खाली बेकायदेशीर रित्या बांधलेले नेक्सा कार शोरूम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए ) च्या वतीने तोडण्यात आले. ही कारवाई सोमवारी झाली. कल्याण भिवंडी मार्गांवर कोनगाव येथे नेक्सा कारच्या शोरूमचे तळ आणि दोन मजली इमारती चे बांधकाम सुरु असताना अचानक एमएमआरडीएचे अधिकारी तोडफोड पथकासोबत जेसीपी मशीन घेऊन धडकले. एमएमआरडीए च्या तोडफोड पथकाने बांधकाम करणार्‍या नेक्सा कारच्या मालकाला कोणतीही संधी ना देता नेक्साचे बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरु केले. या जमिनदोस्तच्या कारवाईत शोरूम पूर्णतः ध्वस्त झाले. या कारवाईत नेक्सा शोरूम चे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) च्या अंतर्गत 52 गाव, वस्ती, वाड्या, येतात. या नेक्सा कारचे शोरूम देखील एमएमआरडीएच्याअंतर्गत येत आहे. नेक्सा कारचे शोरूम ज्या ठिकाणी बांधण्यात आले त्याच्या वरून टाटाची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी खाली इमारतीची बांधकामास सक्त मनाई असताना नेक्सा कार शोरूमच्या मालकाने भ्रष्ट मार्गाने दोन मजली इमारती चे बांधकाम बेकायदा सुरू केले होते. या बाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्याने एमएमआरडीएने नेक्साला दोन वेळा नोटीस बजावली होती.

- Advertisement -

बांधकाम तत्काळ थांबवण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु नेक्सा कारचे मालक श्रीनाथ अहिरे यांनी बांधकाम सुरूच ठेवल्याने शेवटी एमएमआरडीएच्या वतीने नेक्सा शोरूमवर कारवाई करण्यात आली. एमएमआरडीएच्या या कारवाईमुळे कल्याण भिवंडी मार्गांवर जबरदस्त वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -