घरमहाराष्ट्रकोकणवासीयांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेच्या विशेष ६ गाड्या!

कोकणवासीयांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेच्या विशेष ६ गाड्या!

Subscribe

उन्हाळी सुट्टी सुरू झाली की कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढते. सध्या तर कोकण रेल्वेच्या गाड्या भरभरुन जात आहेत. त्यामुळे या मार्गावर विशेष सहा गाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमाळी दरम्यान २ फेऱ्या, पनवेल ते करमाळी दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ४ फेऱ्या अशा एकूण सहा फेऱ्या चालवल्या जातील.

या गाड्यांविषयी थोडक्यात

सीएसएमटी ते करमाळी या दरम्यान १ आणि २ मे च्या मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि करमाळीला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. करमाळी येथून ही गाडी ४ मे रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल व रात्री ११.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. पनवेल ते करमाळी ही गाडी पनवेल येथून २ मे आणि ३ मेला मध्यरात्री ११.४० ला सुटेल आणि करमाळीला सकाळी ९ वाजता पोहोचेल. करमाळी येथून २ मे आणि ३ मे रोजी दुपारी २ वाजता गाडी सुटेल आणि पनवेलला रात्री १०.४० ला पोेहोचेल. या सर्व गाड्यांचे आरक्षण १ मे पासून उपलब्ध होईल.

- Advertisement -

उन्हाळी सुट्टी सुरु झाली की मामाच्या गावाला जाऊया म्हणत शहरातील नोकरदारांना वेध लागतात गावाकडे जाण्याचे. कोकणात जाण्यासाठी लोकांची रीघ लागते. रेल्वेचे कन्फर्म तिकीट या काळात मिळणे जवळपास अशक्यच असते. त्यामुळे रेल्वेने या ६ गाड्या देऊन एक प्रकारे चाकरमान्यांना दिलासाच दिला आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -