घरमहाराष्ट्रशिक्षण सचिवांची पालकांनी काढली रस्त्यावर अब्रू, व्हिडिओ व्हायरल

शिक्षण सचिवांची पालकांनी काढली रस्त्यावर अब्रू, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

राज्यातील पालकांना आणि सर्वसामान्यांना तुच्छ लेखून त्यांना अपमानजनक वागणूक देणाऱ्या शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांची पुण्यात भर रस्त्यात पालकांनी अब्रू काढली. त्यांनी या अधिकाऱ्यांना ‘जनतेच्या कराच्या पैशावर अधिकारी जगतात, तुमचे घर आमच्यामुळे चालते’, असे खडे बोल सुनावले. नंदकुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पळता भुई थोडी केल्याने पोलिसांच्या मदतीने त्यांना पळ काढावा लागल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

दोन वर्षांनी सापडले पालकांच्या तावडीत

मंत्रालयात आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयात आलेल्या पालकांची भेट न घेता त्यांना उर्मटपणे वागणूक देणाऱ्या आणि त्यांना गेटआऊट बोलणाऱ्या नंदकुमार यांना पुण्यातील पालकांनी चांगलाच हिसका दाखवला. यामुळे मागील अनेक वर्षांपासून संतापलेल्या पालकांच्या तावडीत सापडलेल्या नंदकुमार यांना पोलिसांच्या मदतीने आपली सुटका करत येथून पळ काढावा लागल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे.

मागील तीन वर्षांत नंदकुमार यांनी केलेल्या अनेक कामांत मोठे गैरप्रकार झाले असून त्याची चौकशी करण्याची आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी मी स्वत: विधानपरिषदेत केली आहे. मुख्यमंत्र्यांकडेही तक्रारी केल्या आहेत. यामुळे पालकांचा संताप आता तरी सरकारने लक्षात घेऊन नंदकुमार यांची दुसरीकडे बदली करण्याऐवजी त्यांची चौकशी करावी.

नागो गाणार, शिक्षक आमदार

- Advertisement -

‘भ्रष्टाचाराने हात बरबटलेले’

हा व्हिडिओ पुण्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील ही घटना आहे. नंदकुमार यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून न्यायालयात गेलेल्या प्राजक्ता पेटकर आणि पालक संघटनेच्या महिला यात दिसत आहेत. ही सर्वजण नंदकुमार यांच्याविरोधात घोषणा देत त्यांच्याविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आहेत. तर यात महिला या अधिक आक्रमक झालेल्या दिसत आहेत. पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर संस्थाचालकांवर का कारवाई केली नाही? असा सवाल यात उपस्थित केला जात आहे. तर काहीजण ‘नंदकुमार यांचे भ्रष्टाचाराने हात बरबटले असून त्यांची चौकशी करा, त्यांना या पदावरून हाकलून द्या’, अशीही मागणी करत आहेत. पालकांना कार्यालयातून हाकलून देण्याचा यांना कोणी अधिकार दिला? असा सवाल करत नंदकुमार यांच्या अब्रूची लक्तरे टांगताना पालक दिसत आहेत.

संस्थाचालकांच्या सांगण्यावरून ‘नंदकुमार पालकांचे काही ऐकत नाही’, असे अनेक आरोप पालक यात करत आहेत. तर ‘पालकांच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या नाहीत’, असा दावा नंदकुमार पोलिसांच्या मागे थांबून करत आहेत.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -