घरताज्या घडामोडीलासलगाव जळीतकांडातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Subscribe

लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीररीत्या भाजलेल्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भायखळा येथील मसिहा रुग्णालयात पीडितेने अखेरचा श्वास घेतला.

नाशिक येथील लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीररीत्या भाजलेल्या पीडितेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. भायखळा येथील मसिहा रुग्णालयात रात्री १२.३० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत पीडितेचे शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर तिचा मृतदेह लासलगाव येथे तिच्या राहत्या घरी पाठवण्यात येणार आहे.

काय घडले नेमके

१५ फेब्रुवारी रोजी लासलगाव बस स्थानकात ही घटना घडली होती. आपसातील वादातून अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत ही आग लागली होती. यात सदर महिला ६७ टक्के भाजली होती. नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात शनिवारी पीडितेला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पीडितेचा पती रामेश्वर भागवत, पेट्रोलपंप व्यवस्थापक व कर्मचारी आकाश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यातील प्रमुख आरोपी रामेश्वर भागवतला निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, आकाश शिंदेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. मात्र, पेट्रोलपंप व्यवस्थापकास अद्यापही अटक केलेली नाही.


हे ही वाचा – लासलगाव: पीडीतेच्या जबाबाने गोंधळ, संशयाची सुई कुटुंबाकडे!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -