घरमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये घराच्या अंगणात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

नंदुरबारमध्ये घराच्या अंगणात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

Subscribe

बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना फरफटत घेऊन गेला.

दिवसागणिक मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे त्याच सोबत बिबट्यांचे हल्ले सुद्धा वाढले आहेत. अशातच नंदुरबारमध्ये घराच्या अंगात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतर बिबट्याने त्या महिलेला फरफटत नेऊन ठार केले. मोगराबाई रुमा तडवी असे या महिलेच नाव आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा माली आंबा याठिकाणी ही भीतीदायक घटना घडली.

दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावकऱ्यांकडून या परिसरात असणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमकी काय घटना घडली?
55 वर्षीय मोगराबाई रुमा तडवी या रात्री नऊच्या वाजण्याच्या सुमारास मालीआंबा इथे आपल्या राहत्या घराच्या अंगणात जेवण करत होत्या त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना फरफटत घेऊन गेला. यावेळी त्यांच्या घरात कोणीच नसल्यामुळे असहाय्य झालेल्या मोगराबाई तडवी यांना बिबट्याने घरापासून सुमारे वीस ते पंचवीस मीटर अंतरावर नेऊन बिबट्याने त्यांची दुरावस्था केली.

Nandurbar Leopard Attack News A leopard attacked a woman who was eating in the courtyard of the house Nandurbar News : घराच्या अंगणात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, फटफटत जंगलात नेलं

- Advertisement -

दुसऱ्या दिवशी सकाळी बिबट्या मृतदेहाचे लचके तोडताना दिसला
ही घटना घडल्या नंतर रात्री मोगराबाई तडवी यांचे पती आणि मुलगा घरी आले. मोगरबाई घरात दिसल्या नाहीत म्हणून त्यांनी हाक मारायला सुरुवात केली. जंगल परिसर असल्यामुळे घराभोवती अंधार होता. त्या अंधारातच मोगराबाई यांच्या पतीने आणि मुलाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मग पुन्हा रात्री तीनच्या सुमारास मोगराबाई यांना आवाज दिला गेला पण तेव्हा देखील त्या दिसल्या नाहीत. मग सकाळी सहाच्या सुमारास उजेड पडल्यानंतर दोघांनीही त्यांचा पुन्हा शोध घेतला. त्यावेळी घरापासून सुमारे 20 ते 25 मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर बिबट्या मोगराबाई यांचा मृतदेहाचे लचके तोडताना दिसली, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली.

ही घटना गाडल्यानंतर या घटनेची माहिती डाबचा मालीआंबा गावाच्या सरपंचांना देण्यात आली. त्याचसोबत वन विभाग आणि पोलिसांनाही कळवण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. दरम्यान, मृत मोगराबाई तडवी यांच्या घराजवळच्या परिसरात जंगल आहे. त्यामुळे या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.


हे ही वाचा – शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?; राज्यपाल-त्रिवेदींवर उदयनराजेंचा घणाघात

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -