घरमहाराष्ट्रभयंकर! रात्रीच्या काळोखात बिबट्या आला अन् चिमुकल्याला आईच्या कुशीतून घेऊन गेला

भयंकर! रात्रीच्या काळोखात बिबट्या आला अन् चिमुकल्याला आईच्या कुशीतून घेऊन गेला

Subscribe

नगरमधील पाथर्डी तालुक्यात बिबट्याने एका चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डी तीळ करडवाडी येथील तीन वर्षांच्या मुलाला बिबट्याने घरातून उचलून नेले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी मुलाला शोधण्यासाठी शोधमोहिमही सुरु केली होती. त्यानंतर आज, शुक्रवारी सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या ३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय आहे घटना 

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात बिबट्याने काल, गुरूवारी रात्री आईच्या कुशीतून तीन वर्षांच्या मुलाला उचलून नेले होते. आज सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सार्थक बंधवत असे या तीन वर्षांच्या मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह, स्थानिकांनीही मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. काल संध्याकाळपासूनच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने मुलाचा शोध घेत होते. गेल्या १५ दिवसांमध्ये बिबट्याने हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. तसेच पाथर्डीत धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचे मोठ आव्हान आता वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

भिवंडीत Monginis केक कारखान्याची इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -