घरमहाराष्ट्रभिवंडीत Monginis केक कारखान्याची इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

भिवंडीत Monginis केक कारखान्याची इमारत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

Subscribe

पहाटे कामगारांची सुट्टी झाल्याने सर्व कामगार हे बाहेर पडले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

भिवंडी तालुक्यातील दापोडा येथे असणाऱ्या श्रीराम कम्पाऊंडमधील मॉन्जिनीस केक कारखान्याची दोन मजली इमारत आज कोसळली. या घटनेत सुदैवाने कामगारांना सुट्टी झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अशी घडली घटना

आज पहाटेच्या सुमारास मॉन्जिनीस केक कारखाना इमारत दुर्घटना घडली असून दोन मजली असलेल्या या कारखान्याचा पहिला माळा हा कोसळला आहे. पहिला माळा कोसळल्यामुळे खालच्या माळ्यावर अतिरिक्त ताण पडला त्यामुळे खालच्या मजल्याचे खांब तुटल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दापोडा इथं श्रीराम कम्पाऊंडमध्ये मॉन्जिनीस केकचा कारखाना आहे. या कारखान्यातून मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात केक आणि बेकरीचे पदार्थ पाठवले जात असतात. दरम्यान, या कारखान्यात एक ते दोन टनाचे दहा ते बारा केक बनवण्याचे ओव्हन आहे. सुदैवाने पहाटे कामगारांची सुट्टी झाल्याने सर्व कामगार हे बाहेर पडले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत तीन कामगार कारखान्यात अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे.


दिलासा! देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार ३८६ रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -