Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र 'प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, मी १६ आमदारांना अपात्र करेन'; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ...

‘प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, मी १६ आमदारांना अपात्र करेन’; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांचे सूचक वक्तव्य

Subscribe

नाशिक : राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची वेळ जवळ येत चालली होत. ११ किंवा १२ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हा निकाल येण्या आधीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले आहे. माझ्याकडे त्या आमदारांचे प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन, असे नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे. झिरवळ यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून आता सर्व लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.

शिवसेनेतली फूट घटनात्मकदृष्ट्या वैध की अवैध? मुख्यमंत्र्यांसह त्यांचे 16 सहकारी अपात्रतेच्या कारवाईपासून वाचणार की नाही? सरकारला धोका आहे की नाही या प्रश्नांची उत्तरं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून मिळणार आहे. १० मे नंतर हा निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले, जर तुमच्याकडे आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार? असा सवाल करण्यात आला. त्यावर येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

- Advertisement -

विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असे होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असा दावाही त्यांनी केला. माझ्याकडे हे प्रकरण येईल की नाही हे कोण पक्कं सांगू शकते? कारण शेवटी कोर्ट कोर्ट आहे. हे प्रकरण महत्त्वाचे आहे हे सर्वच म्हणतात. तेव्हाही महत्त्वाचे होते. आजही त्याचे महत्त्व आहेच, असेही झिरवळ यांनी सांगितलं.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -