घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशहरासह जिल्ह्याभरात २०३ औषधविक्रेत्यांचे परवाने निलंबित तर ५५ थेट रद्द

शहरासह जिल्ह्याभरात २०३ औषधविक्रेत्यांचे परवाने निलंबित तर ५५ थेट रद्द

Subscribe

नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाने घालून दिलेले नियम तसेच त्यासंबंधी असलेल्या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची बाब समोर आल्याने मागील दीड वर्षात शहरासह जिल्हयाभरात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येते. त्याच अनुषंगाने दीड वर्षात तब्बल २०३ औषध विक्रेत्यांचे विक्रीपरवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर, ५५ विक्रेत्यांचे विक्रीपरवाने थेट रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

औषध विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी औषधशास्त्रात अर्थात फार्मसी या विद्याशाखेचा किमान डिप्लोमा किंवा पदविका प्राप्त करणे आवश्यक असते. ज्यातून विक्रेत्याला औषधांच्या बाबतचे शस्त्रशुद्ध ज्ञान आहे हे सिद्ध होत असते. डिप्लोमा किंवा पदविका मिळवलेल्या व्यक्तिला अन्न व औषध प्रशासनात मागणी केल्यानंतर औषध विक्रीचा परवाना दिला जातो. परवानाधारक व्यक्तिनेच स्वत दुकानात उपस्थित राहून औषध विक्री करणे अपेक्षित असते. मात्र, अन्न औषध प्रशासनाने केलेल्या तपासात या महत्वपूर्ण नियमासोबतच अनेक नियमांच सर्रास उल्लंघन होत असल्याच समोर आल आहे. काही परवानाधारक व्यावसायिकांकडून मेडिकलचा परवाना एकाचा आणि औषध विकणारा दुसराच असताे, तर परवाना एक व दुकाने चार असे अनेक गैरप्रकार आढळून येतात.

- Advertisement -

खरतर, औषधे दुकानात ज्या व्यक्तिला परवाना प्राप्त आहे त्यानेच औषध विक्री करण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक असते. मात्र, अनेक ठिकाणी कुटुंबातील व्यक्ती, कामगार संपूर्ण कारभार सांभाळत असतात. केमिस्टच्या अनुपस्थितीत नाेंदणीकृत फार्मासिस्ट असावा दुकानात असावा. मात्र, त्याही गोष्टीकडेही दुर्लक्ष केल जात असल्याने औषध देतांना कुठली चूक झाली आणि त्यातून रुग्णाच्या आरोग्यावर कुठला विपरीत परिणाम झाल्याचं कोणाला जबाबदार धरायचे हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचसोबत अनेक ठिकाणी ‘एच-१’ची औषधे सुद्धा प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्रास विक्री केली जातात. त्याच सोबत औषधाच्या दुकानात फ्रीज तसेच इतर काही साहित्य असणे आवश्यक असते. त्याचेही पालन होताना दिसत नाही. यासर्व बाबी समोर आल्यामुळे प्रशासनाच्या वतीने मागील दीड वर्षाच्या काळात धडक कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -