घरदेश-विदेश'Tom & Jerry' चे दिग्दर्शक जीन डाइच ९५ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

‘Tom & Jerry’ चे दिग्दर्शक जीन डाइच ९५ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

Subscribe

जीन डाइच १६ एप्रिल रोजी आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आले.

प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर्स Tom and Jerry आणि Popeye the sailor man यांसारख्या लोकप्रिय कार्टून्सचे निर्माते, ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार जीन डाइच (Gene Deitch) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. जीन डाइच १६ एप्रिल रोजी चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरातील राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आले. मात्र त्यांचे निधन कशामुळे झाले अद्याप स्पष्ट झाले नाही. जीन यांच्या मृत्यूसंदर्भातील माहिती पीटर हिमेल (Petr Himmel) दिली आहे. जीन यांचे आकस्मिक निधन झाल्याच्या वृत्तावर पीटर यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

- Advertisement -

जीन डाइच यांनी नॉर्थ अमेरिकन एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन म्हणून काम केल्यानंतर त्यांनी लष्करासाठी काम केले, त्या नंतर वैमानिक होण्याचे प्रशिक्षणही घेतले होते. १९४४ साली आरोग्याच्या अडचणींमुळे त्यांनी हे क्षेत्र सोडून पुन्हा कमर्शियल आर्टकडे वळले. तिथून त्यांच्या अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात झाली. जीन यांनी ट्विटीयथ सेंच्यूरी फॉक्स (20th Century Fox) या कंपनीसाठी टेरीटून्सचे (Terrytoons) दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी तेथे सिडनी द एलिफंट (Sidney the Elephant), गॅस्टॉन ली क्रेऑन (Gaston Le Crayon), क्लिट कॉब्लर (Clint Clobber) आणि टेरीबल थॉम्पसन (Terr’ble Thompson) सारखी कार्टून कॅरेक्टर स्वत: निर्माण केली.

- Advertisement -

या निर्णयामुळे Tom and Jerry जोडी हिट

१९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर (Rembrandt Films) काम करताना पोपॉय (Popeye) कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत (Metro-Goldwyn-Mayer) काम करताना टॉम अ‍ॅण्ड जेरी (Tom and Jerry) ची सिरीज तयार केली. संपूर्ण जगाला आपल्या कार्टून कॅरेक्टर्सनी भूरळ घालणारे जीन आधी उत्तर अमेरिकेमध्ये सैन्यात काम करत होते. ते सैन्यातील पायलट्सना ट्रेनिंग देणे आणि सैन्यासाठी ड्राफ्टमॅनचे काम करत होते. हे क्षेत्र सोडल्यानंतर सैन्यदलानंतर जीन डाइच यांनी अॅनिमेशनमध्ये आपले पुढिल करिअर करण्याचा निर्णय घेतला. यांनीच जगाला टॉम अ‍ॅण्ड जेरी ही हिट जोडी दिली. अॅनिमेशनमध्ये जीन डाइच यांनी खूप काम केले परंतु खरी ओळख लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर्स टॉम अ‍ॅण्ड जेरी, पोपाय द सेलर मॅन यांच्यामुळे मिळाली.


Video : भूक भागवण्यासाठी त्यांच्यावर आली किंग कोब्रा खाण्याची वेळ!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -