Live Update : मुंबईतील सर्व वकील संपावर

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

मुंबईतील सर्व वकील संपावर

बोरिवलीमधील कोर्टात वकिलाला मारहाण प्रकरण


अमृता फडणवीसांना फसविण्याचा प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

सत्र न्यायालयाने दिले आदेश


सांगलीच्या जतमध्ये भरदिवसा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

विजय ताड असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव

प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती


राष्ट्रपतींनी सरन्यायाधिशांना संरक्षण देऊन योग्य कारवाई करण्याची विरोधी खासदारांची मागणी

राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या खासदारांचे राष्ट्रपती मुर्मूंना पत्र

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याविरोधात ट्रॉलर्स सक्रिय असल्याचा पात्रातून आरोप

सक्रिय असलेले ट्रॉलर्स हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याचा विरोधकांचा आरोप


संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील

राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

याचिकेवरील सुनावणी २३ मार्चपर्यंत तहकूब

राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात आज हायकोर्टात तातडीची सुनावणी

मागण्या रास्त असू शकतात, पण संप बेकायदेशीरच – गुणरत्न सदावर्तेंची याचिका


नाशिकमध्ये संपकऱ्यांवर कारवाईला सुरुवात

महसूल विभागाच्या १ हजार ५६ कर्मचाऱ्यांना नोटीसा


संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर


राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता

गारपीट, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान