घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023Live Assembly Budget 2023 : विधानसभेचे आजचे कामकाज संपले

Live Assembly Budget 2023 : विधानसभेचे आजचे कामकाज संपले

Subscribe

विधानसभेचे आजचे कामकाज संपले


विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

- Advertisement -

तालिका अध्यक्ष म्हणून महिला आमदाराची नेमणूक नाही – वर्षा गायकवाड

राज्यपालांच्या अभिभाषणात एकूण ७७ मुद्द्यांपैकी महिलांसाठी तीनच मुद्दे – गायकवाड

- Advertisement -

महिलांना समजून घेण्यासाठी महिला मंत्री पाहिजे

आम्ही दहा आमदार असताना दोघीजणी मंत्री होतो, तोडीस तोड खाती द्या – गायकवाड


मुलीच्या लग्नासाठी २ लाखांचं अनुदान द्या, आमदार मंजुळा गावित यांची सभागृहात मागणी


उद्धव ठाकरे विधान परिषदेत दाखल


तीन तलाक मुस्लिम महिलांसाठी घातक- अबु आझमी


महिला धोरणावर चर्चा सुरू असताना सभागृहात गोंधळ

महिला दिनीच महिलांच्या प्रश्नांकडे सर्वांचं दुर्लक्ष


शेतकऱ्यांच्याप्रश्नी विरोधकांचा सभात्याग

विरोधकांचा सभात्याग हे निव्वळ राजकारण आहे- देवेंद्र फडणवीस


आर्थिक सर्वेक्षण अहवाल देवेंद्र फडणवीसांकडून सभागृहात सादर


विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करायचं आहे- देवेंद्र फडणवीस

हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत. जर हे शेतकऱ्यांच्या बाजूने असते तर मागच्या काळात मदत केली असती- देवेंद्र फडणवीस

त्यांचे मगरीची अश्रु आहेत- देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधक आक्रमक

विरोधकांची विधानसभेत जोरदार घोषणाबाजी

सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली- अजित पवार

शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळाली नाही- अजित पवार

पीक नुकसानीमुळे शेतकरी हवालदील- अजित पवार

सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी- अजित पवार


म्हाडाच्या इमारतीत राहणाऱ्यांना वाढलेले भाडे रद्द, जुनेच भाडे आकारणार

उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना गती देणार – उपमुख्यमंत्री


अनधिकृत फेरीवाल्यांचे वीजजोडणी कापण्याचे आदेश देणार – उपमुख्यमंत्री


शेतकरी प्रश्नांवरून विधानसभेत विरोधक आक्रमक

गारपीटीने पीकं भूईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, द्राक्ष संत्री, आंबा, मका, ज्वारीला फटका बसला आहे.
पाळीव प्राण्यांनाही फटका बसला आहे. शेतकरी स्वतःला मारून घेतोय. आत्मक्लेष करतोय. अनेक वर्षांत अशी परिस्थिती पाहिली नव्हती. हातातोंडाशी आलेला पीक गेलं. भाजीपाल्याचं नुकसान झालं. कोथिंबीर विकायला लागली. सरकारने तातडीने केंद्र सरकारीच टीम तातडीने बोलावणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान उपस्थित केला.

कामकाज बंद करून सरकारची भूमिका काय. कांदा, कापूस, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. ९९३७ लोकांची वीजतोडणी कापली, कांद्याची खरेदी झालेली नाही. कापसाला अळी लागत आहे. लोकांना त्वचेचे रोग झालेत. ९७ दाखल करून सर्व कामकाज बाजूला सारून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय द्यावा. – नाना पटोले

अख्खं जग होळी खेळत होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा बेरंग झाला- छगन भुजबळ

नाशिकमध्ये अख्खा गाव विकायला काढला- छगन भुजबळ


मविआ नेत्यांची आज बैठक, ठाकरेही राहणार उपस्थित

दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे विधानभवनात येणार


विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन


विधानभवनात आगमन होतेवेळी सर्व सन्माननीय महिला सदस्यांचे विधानसभा अध्यक्ष महोदय राहुल नार्वेकर आणि उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, आजच्या विधानसभा कार्यक्रम पत्रिकेवर सर्व लक्षवेधी सूचना सन्माननीय महिला सदस्यांच्याच घेण्यात आल्या आहेत. अध्यक्ष महोदय यांचा हा अभिनव निर्णय. महिलांच्या विषयावरील पुस्तकांचे विशेष प्रदर्शन विधानमंडळ मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा, आधुनिक महिला धोरण ठराव मांडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -