घरताज्या घडामोडीMaharashtra Lockdown: लोकल सेवा राहणार सुरु; पण केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच!

Maharashtra Lockdown: लोकल सेवा राहणार सुरु; पण केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच!

Subscribe

उद्या (बुधवार) रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले. उद्या (बुधवार) रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कलम १४४ लागू करण्यात येणार असून पुढील १५ दिवसांसाठी संचारबंदी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात येणार नाही. तसेच लोकल सेवाही सुरु असणार आहे. परंतु, केवळ आवश्यक कामांसाठीच, तसेच अत्यावश्यक सेवेतील आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून लोकल सेवा सुरु ठेवत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पाणी सोडणारे, सफाई कर्मचारी यांना आपण वर्क फ्रॉम होम देऊ शकत नाही. त्यांना घरी राहून शहर स्वच्छ ठेवता येणार नाही. त्यांना कोरोनाचे संकट असो वा नसो, आपल्याला सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावे लागते. त्यांची ये-जा सुलभतेने व्हावी म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवेतील लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरता येणार आहे.

- Advertisement -

बुधवार रात्री ८ वाजल्यापासून सर्व निर्बंध लागू होणार आहे. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार असून पुढचे १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -