घरमहाराष्ट्रलॉकडाऊन ५ : ३० जूनपर्यंत वाढणार

लॉकडाऊन ५ : ३० जूनपर्यंत वाढणार

Subscribe

टप्प्याटप्प्याने सूट, ८ जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे, मॉल्स उघडणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची शनिवारी घोषणा केली असून कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. हा निर्णय जाहीर करताना ८ जूनपासून हॉटेल, धार्मिक स्थळे आणि मॉल्स उघडले जाणार आहेत,

पाचव्या लॉकडाऊनमध्ये रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. याचबरोबर शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकारतर्फे नंतर निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

८ जूनपासून मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्च सुरू करण्यात येणार असून अनेक राज्यांनी मॉल सुरू करण्याची मागणी केल्याने मॉलही टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. शाळा, कॉलेज दुसर्‍या टप्प्यात उघडण्याची शक्यता आहे. याशिवाय हॉटेल्स आणि रेस्टॉरंटही सुरू करण्यात येतील. पण, या सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांसह सलूनही सुरू होतील, पण त्यासाठी अटी लागू केल्या जातील. त्यांचे पालन करावे लागेल, पण राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

कुठेही जाता येणार

एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसेच कुठेही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगी घ्यावी लागणार नाही.

- Advertisement -

राज्यांकडे अधिक अधिकार

राज्यांना केंद्र सरकारने जास्त अधिकार दिले आहेत. बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे. केंद्र सरकारने बंदी हटवल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार आहेत.

पहिल्या टप्प्यात काय उघडणार
* ८ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
* हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरू होणार.
* शॉपिंग मॉल उघडणार.

दुसर्‍या टप्प्यात काय उघडणार
* शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करून उघडण्यात येतील.

तिसर्‍या टप्प्यात काय उघडणार
* सर्व परिस्थितीचे आकलन करून या गोष्टी कधी सुरू करायच्या त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.
* आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे.
* सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल.
* क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -