घरCORONA UPDATECorona Live Update: राज्य सरकारची चित्रीकरणाला परवानगी!

Corona Live Update: राज्य सरकारची चित्रीकरणाला परवानगी!

Subscribe

मिशन बिगीन अगेन..पुन:श्च हरिओम!

राज्यात लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेन अर्थात पुन:श्च हरिओम करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवा लॉकडाऊन आणि अनलॉक १, २, ३ कसा असेल, त्याविषयी माहिती दिली. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मनोरंजन होणार Unlock; राज्य सरकारची चित्रीकरणाला परवानगी!

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात चित्रपट, मालिका अशा कोणत्याही मनोरंजनात्मक गोष्टींचं चित्रीकरण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद झालं होतं. अनेक चित्रपटांचं अगदी काही दिवसांचं चित्रीकरण देखील अडकलं होतं. याशिवाय कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्वात काम करणारे कलाकार किंवा पडद्यामागचे कर्मचारी अशा सगळ्यांनाच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. शनिवारी केंद्र सरकारने लॉकडाऊन ५.० आणि अनलॉक १.० जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारने राज्यातल्या सामान्य जनतेसाठी अनलॉक १, २ आणि ३ या फेजसाठी घोषणा केल्या. त्यानंतर आता मनोरंज विश्वासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळून चित्रीकरणाला आणि त्याच्याशी संबंधित इतर सर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच आपली नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ५ ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


जूनपासून शाळा सुरू होणार नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत घेतल आहे. “दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि करोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावे” असा निर्णय घेण्यात आला आहे.


अनलॉक १.० निर्णयाचे स्वागत – रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केली असून कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. हा निर्णय जाहीर करताना ८ जूनपासून हॉटेल, धार्मिक स्थळे आणि मॉल्स उघडले जाणार आहेत.   केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अनलॉक १.० या निर्णयाचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने स्वागत केले आहे.

नव्या परिपत्रकानुसार दिलेल्या सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या मॉल्सना आपले व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोट्यवधी रोजगार वाचवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी मॉल्स आणि सर्व प्रकारच्या किरकोळ विक्री करणारी दुकाने उघडणे महत्वाचे आहे. किरकोळ विक्री सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रिटेलर्स असोसिएशन हे विविध सरकारी संस्थांशी संपर्क साधत आहेl. मॉल्समध्ये आता नियंत्रित व सुरक्षित वातावरण खरेदी करणे शक्य आहे, या असोसिएशनच्या मताशी सरकार सहमत आहे, याचा असोसिएशनला आनंद वाटतो असे रिटेलर्स एसोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कुमार राजगोपालन यांनी स्पष्ट केले.

मास्कपासून मिळणार सुटका? युनिव्हर्सिटीचे नवे संशोधन

कोरोना विषाणुच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मास्क परिधान करणे हे आता बंधनकारक झाले आहे. मात्र आता मास्कपासून कायमची मुक्ती मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोविड १९ च्या युद्धात मास्क परिधान केल्यामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास उद्भवू लागण्याचे पाहायला मिळाले. यावर तोडगा म्हणून पंजाबच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने आता आगळ्यावेगळ्या पद्धतीचा मास्क बनवला आहे. त्यांनी मल्टिपर्पज एल्गीवर बेतलेला रेस्पिरेटर ऑक्सिजेनो बनवला असून याच्या वापरामुळे मास्कपासून सुटका मिळण्याचा दावा त्यांनी केला आहे. (सविस्तर वाचा)


आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना सुरु होणार

देशातील गरिबांना दिलासा देण्यासाठी उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून होईल. या योजने अंतर्गत रेशनकार्डचा लाभ देशात कुठुनही घेता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करताना याचा उल्लेख केला होता. केंद्र सरकारच्या या योजनेचा ६७ कोटी लोकांना फायदा होईल. (सविस्तर वाचा)


प्रवासापूर्वी रेल्वेचे हे नियम जाणून घ्या

भारतीय रेल्वे सोमवारी १ जूनपासून २०० नवीन गाड्या चालवणार आहे. या गाड्या सध्या कार्यरत असलेल्या १५ कामगार आणि एसी विशेष गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील. २१ मेपासून या गाड्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू झालं आहे. प्रवाशांना आता या गाड्यांसाठी १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांपूर्वी रिजर्वेशन करता येणार आहे. (सविस्तर वाचा)


पंतप्रधान मोदींची नाशिकच्या जाधवांना शाबासकी

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिक असलेले राजेंद्र जाधव संशोधक आहेत, त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे कोरोनाच्या लढ्यासाठी मोठी मदत झाली झाली आहे व होणार आहे, त्यामुळे या उल्लेखनीय निर्मिती कार्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात विशेष कौतुकोद्गार काढून संशोधकांचा गौरव केला आहे. (सविस्तर वाचा)


गेल्या २४ तासांत राज्यातील ९१ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या २४१६ इतकी झाली आहे. तर २६ पोलिसांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ९६९ पोलिसांनी करोनाचा पराभव केला आहे. १४२१ करोनाबाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. (सविस्तर वाचा)


पुण्यातील एपीएमसी बाजारपेठ आजपासून सुरू करण्यात आली आहे. तब्बल ५० दिवस बंद असलेली ही बाजारपेठ अखेर खुली करण्यात आली असून ११ हजार क्विंटल धान्यांच्या २०० गाड्या या एपीएमसीमध्ये आल्याचे येथील प्रशाकस बी. जे. देशमुख यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ३१ मे रोजी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांचे हे ६५ वे मन की बात कार्यक्रम आहे. (सविस्तर वाचा)

LIVE #MannKiBaat.

LIVE #MannKiBaat.

Narendra Modi ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 30, 2020


राज्य सरकारने शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सर्व कर्मचारी आणि भेटीसाठी येणाऱ्यांना थर्मल स्कॅनरद्वारे तपासले जाईल. तपासणी काटेकोरपणे केली जात आहे की नाही यावर लक्ष दिली जाईल. कार्यालयात काम करताना सर्व कर्मचा्यांना ३ स्तराचे मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.


राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार, १ जूनपासून हे नवे दर लागू होणार आहेत. (सविस्तर वाचा)


देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ८२ हजार १४३ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ८ हजार ३८० कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात ८९ हजार ९९५ अॅक्टीव्ह केसेस असून आतापर्यंत देशभरातील ८६ हजार ९८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर कोरोनामुळे ५ हजार १६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल दिवसभरात १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


तामिळनाडू सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला. सर्व जिल्ह्यांची ८ झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच प्रवासासाठी ई पासची सक्ती नसल्याचे त्यांचे म्हटले आहे.


मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानक येथे आपापल्या राज्यात जाण्यासाठी मोठ्या संख्यने कामगार, मजुरांनी गर्दी केली होती. प्रवासाला जाण्याकरता या परप्रांतियांनी रांगा लावल्या होत्या.


देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी आज ३१ मे २०२० ला संपत आहे. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११ वाजता मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कोरोनाविषयी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -