घरमहाराष्ट्रपुणेLok Sabha 2024 : पुणे लोकसभेवर भाजपाच्या 'या' माजी खासदाराचा दावा, पण...

Lok Sabha 2024 : पुणे लोकसभेवर भाजपाच्या ‘या’ माजी खासदाराचा दावा, पण संधी कोणाला?

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा या कधीही जाहीर करण्यात येऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार हे आपापल्या कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडूनही जागांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्या लोकसभेत कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार? यांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशातच आता भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी या लोकसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Lok Sabha 2024 : Former BJP MP Sanjay Kakde’s claim on Pune Lok Sabha)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : “दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार”, राहुल नार्वेकरांची स्पष्ट भूमिका

- Advertisement -

पुणे लोकसभा हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे महायुतीतही ही जागा भाजपालाच मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपाकडून अनेकांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे कळवले आहे. ज्यामुळे आता माजी खासदार यांनी मी स्वतः पुणे लोकसभेसाठी इच्छूक आहे, असे सांगितले आहे. तर त्यांनी भाजपाच्या गोटात नेमके काय सुरू आहे, याबाबतचीही माहिती दिली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय काकडे म्हणाले की, संपूर्ण भारतात इंडिया आघाडी लोकसभेची तयारी करत असली तरी त्यांच्या या तयारीचा त्यांना काहीच फायदा होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत आणि त्यांची देशात जी प्रतिमा तयार झाली आहे, ती पाहता आणि तरुण वर्गाला मोदींचं जे आकर्षण आहे ते पाहता आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीचा सुपडा साफ होईल. आपल्या देशातील तरुणांना विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी करून दाखवतील. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीच्या असण्याने भाजपाला काहीच फरक पडणार नाही.

- Advertisement -

तर, पुणे लोकसभेबद्दल बोलायचे झाल्यास, या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही पाच ते सहा जण इच्छूक आहोत. मी स्वतः पुणे लोकसभेसाठी इच्छूक आहे. माझ्यासह जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ आणि सुनील देवधर पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. आमच्या चौघांसह पडद्यामागे काम करणारे अनेकजण निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. ते सर्वच जण आपापल्या परीने पक्षाचेच काम करत आहेत. माझे धोरण असे आहे की अनेकांनी इच्छूक व्हावे. हे सर्व इच्छूक उमेदवार पक्षाचे काम करतात त्यामुळे पक्षात चैतन्य निर्माण होते, असेही भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, ज्याला कोणाला निवडणुकीचे तिकीट मिळते ते त्याच्या कामी येते. मी इच्छूक उमेदवार म्हणून माझ्या परीने काम करत आहे. मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधर हेदेखील त्यांचे काम करत आहेत. यांच्यासह काही नेते पडद्यामागे आहेत. त्यांचेही मतदारसंघात मोठे जाळे आहे. ते सर्वजण काम करत आहेत. ते पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात पक्षाचे कार्य करत आहेत, पुढेही करतील. पक्षकार्यासाठी अनेकजण इच्छूक असणे हे पक्षासाठी खूप फायद्याचे असते, असे स्पष्टपणे संजय काकडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -