घरमहाराष्ट्रलोकसभेचा निकाल धक्कादायक - जयंत पाटील

लोकसभेचा निकाल धक्कादायक – जयंत पाटील

Subscribe

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही समजू शकतो. परंतु सर्वच बुथवर होतो हे शक्य नाही, असा संशय जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही समजू शकतो. परंतु सर्वच बुथवर होतो हे शक्य नाही. हे सगळे धक्कादायक असून आम्ही यावर अभ्यास करत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघात मी गेलो त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला वातावरण अनुकूल होते. आम्हाला ९ ते १२ जागा मिळेल असे वाटत होते. मात्र हा निकाल धक्कादायक आहे‘, लोकसभेचा निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य

उमेदवारांशी बोलल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. शेवटी पराभव हा पराभव असतो. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथील कार्यकर्त्याने लोकांशी चांगला संपर्क ठेवला असताना देखील फक्त ८ मते मिळाल्याचे यावेळी उदाहरण त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

राजू शेट्टी यांचा पराभव धक्कादायक

हातकणंगले मतदारसंघात शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा पराभव धक्कादायक आहे. राजू शेट्टी यांच्या सभांना मिळणाऱ्या गर्दीचा विरोधकांनी धसका घेतला होता. त्यामुळे आता शेतकरीच प्रश्न विचारत आहेत, असे कसे झाले असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आंबेडकर हे विधानसभेच्या २८८ जागा लढवणार

सुरुवातीपासून वंचित आघाडीशी आम्ही चर्चा केली होती. परंतु चर्चा सुरु असतानाच ते उमेदवार जाहीर करत होते. त्यामुळे त्यांना आमच्याशी आघाडी करायची नव्हती शेवटी त्यांनी ४८ उमेदवार उभे केले. त्यांना काही ठिकाणी चांगले मतदान झाले आहे. त्यांचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला आहे. प्रकाश आंबेडकर हे विधानसभेच्या २८८ जागा लढवणार असल्याचे तुम्ही सांगत आहात त्यांना शुभेच्छा परंतु आम्ही त्यांच्याशी चर्चा नक्की करु. तसेच आम्हाला राज्यात चांगले वातावरण होते. राज ठाकरे यांच्यामुळे राज्यभर जागृती चांगली झालेली होती हे नक्की. तसेच महाराष्ट्रातील जनता फार हुशार आहे. लोकसभेला दिलेला कल विधानसभेला राज्यात देईल, असे मला वाटत नसल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

वाचा – पराभवानंतर राजू शेट्टींची भावस्पर्शी प्रतिक्रिया; ‘शेतकऱ्यांसाठी लढत राहणार’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -