घरमहाराष्ट्रLok Sabha : अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबलं...; अजित पवारांची बारामतीकरांना...

Lok Sabha : अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबलं…; अजित पवारांची बारामतीकरांना साद

Subscribe

गेली अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबलं आताही तिथेच मतदान करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात (7 मे) होणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र येथील मतदारसंघ निवडणुकीआधीच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. कारण याठिकाणी पवार विरुद्ध पवार आणि नणंद -भावजय अशी लढत होत आहे. याचपार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारातमी मतदारसंघात सभा घेत नागरिकांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबलं आताही तिथेच मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच शरद पवार गटाचे नाव न घेता त्यांनी म्हटले की, काहीजण भावनिक करतील, पक्ष चोरला म्हणतील, पण आम्ही चोरटे आहोत का? दरोडेखोर आहोत का? आम्ही काम करणारी माणसं आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024 Baramit Constituency Ajit Pawar vote watch buttons)

गेली अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबलं आताही तिथेच मतदान करा, असं आवाहन करताना अजित पवार म्हणाले की, आम्ही कुणीही पक्ष चोरला नाही. एकनाथ शिंदे आणि मीदेखील पक्ष चोरला नाही. आज 80 टक्के लोक आमच्यासोबत असल्याने निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे. काहीजण तुम्हाला भावनिक करतील, पक्ष चोरला म्हणतील, पण आम्ही चोरटे आहोत का? दरोडेखोर आहोत का? आम्ही काम करणारी माणसं आहोत. माझ्यात अजून 5 ते 10 वर्ष काम करण्याची धमक आणि ताकद आहे. असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार याचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, इतरांनी काय काम केले हे तुम्हाला माहिती आहे. अजूनही किती कार्यकर्त्यांची नावं त्यांना माहिती नाही. इतके दिवस माझी मोठ्या लोकांची ओळख नव्हती. मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. 90 साली मी राजकारण सुरू केले. 90 पासून गेल्या निवडणुकीपर्यंत बारामतीत अर्ज भरल्यानंतर शेवटच्या सभेसाठी यायचो, पण आता गावोगावी फिरून मला विरोध करत आहेत. मी इतके वर्ष साथ दिली नाही का? कशात कमी पडलो का? आता उगाच येत आहेत, काहीही सांगत आहेत, आम्ही टँकर देऊ, चारा देऊ, डेपो उभा करू, पण 7 तारखेनंतर यातील कुणी येणार नाही. नंतर मी आणि महायुतीच आहे. 7 तारखेचं मतदान झाल्यावर यांच्यातील 2-4 लोकांनी परदेश दौरा केला नाही तर नावाचा अजित पवार नाही, असेही त्यांनी म्हटले.

केंद्राच्या निधीशिवाय पाण्याचं दुखणं सुटणार नाही (Without funds from the Centre, the water woes will not end)

अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच मदत करणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी जी कमिटी तयार करण्यात आली आहे, त्याचे प्रमुख अमित शहा आहेत. कुठेही आपत्कालीन स्थिती आली तर केंद्र मदत करते. त्यामुळे आम्ही कुणीही तुम्हाला पैसा कमी पडू देणार नाही. जुना काळ बाजूला ठेवा आणि आता नवीन काळ बघा. केंद्राचा निधी आणायचा आहे. तो आणल्याशिवाय कायमचं पाण्याचं दुखणं सुटणार नाही, हे लक्षात घ्या. कुठल्या बुथवर काय झाले सर्व कळते. लोकसभेत जे सरकार येणार आहे त्या विचारांचा खासदार निवडून दिल्यानंतर आपल्याला मतदारसंघातील कामे करायची आहेत. काहीजण म्हणाले की, खासदाराची पर्स कोण सांभाळणार? पण पर्स तीच सांभाळणार आहे आणि मी काम करून आणेन. मागच्या अनेक खासदारांपेक्षा महायुतीच्या खासदाराची कारकिर्द उजवी असेल असा विश्वास तुम्हाला देतो, असं अजित पवार यांनी म्हटलं.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -