घरमनोरंजनAmitabh Bachchan : लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर

Amitabh Bachchan : लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर

Subscribe

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे. 

मुंबई : मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाच्या वर्षी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे. (Lata Dinanath Mangeshkar Award announced to Amitabh Bachchan)

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली 34 वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली असून त्याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन म्हणजेच दि. 24 एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत गेल्या 34 वर्षात सुमारे 212 व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले आहेत.

- Advertisement -

2022 वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे. त्यानुसार 24 एप्रिल 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता व 24 एप्रिल 2023 रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो, ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे. यंदाचा हा कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पु.), मुंबई येथे बुधवार 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6.30 वा. पार पडणार आहे. तसेच यंदा 82 व्या पुण्यतिथी निमित्त अध्यक्ष आशा भोसले यांच्या हस्ते खालील सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

पुरस्कार व व्यक्ती

  1. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मविभूषण श्री. अमिताभ बच्चन
  2. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – ए.आर. रहमान (प्रदीर्घ संगीत सेवा)
  3. मोहन वाघ पुरस्कार – गालिब नाटक (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती 2023-24)
  4. आनंदमयी पुरस्कार (आशा भोसले पुरस्कृत) – दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल (समाज सेवा)
  5. वाग्विलासीनी पुरस्कार – मंजिरी फडके (प्रदीर्घ साहित्य सेवा)
  6. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवा)
  7. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा)
  8. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – रूपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा)
  9. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता)
  10. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा)
  11. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – रणदीप हुडा (उत्कृष्ठ चित्रपट निर्मिती)

हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटले की, “मास्टर दीनानाथ यांचे गायक, संगीतकार आणि रंगमंच कलाकार म्हणून अतुलनीय योगदान असून महाराष्ट्र आणि भारतातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ मंगेशकर परिवार दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन करते. या पुरस्कारांसाठी आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याचा आनंद आहे.”

- Advertisement -

पुरस्कार सोहल्यानंतर “श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी” हा संगीतमय कार्यक्रम भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगितीक मानवंदना म्हणून भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर सादर करतील. कलाकार गायिका “दीदी” पारितोषिक विजेती विभावरी आपटे-जोशी (एकल संगीत मैफल) वाद्यवृंद सहकलाकार विवेक परांजपे, केदार परांजपे, विशाल गंडूतवार, डॉ. राजेंद्र दुरकर, प्रसाद गोंदकर व अजय अत्रे सादर करतील. हा संगीत कार्यक्रम हृदयेश आर्टस्तर्फे आयोजित करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ  मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने 82 व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -