घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : ...हा तर निव्वळ अंदाज, तुम्ही निकाल बघा...अजित पवार...

Lok Sabha 2024 : …हा तर निव्वळ अंदाज, तुम्ही निकाल बघा…अजित पवार कशाबद्दल म्हणाले असं?

Subscribe

Lok Sabha Election 2024 : सी व्होटर आणि एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार या निवडणुकीचा निकाल अजित पवार यांच्या पक्षासाठी धक्कादायक ठरू शकतो. याबाबत अजित पवार यांनाच विचारले असता, हा तर निव्वळ अंदाज आहे. ज्या दिवशी निकाल लागेल त्यादिवशी बघा, असं अजित पवार म्हणाले.

मुंबई : कोणत्याही निवडणुकीपूर्वी अनेक सर्व्हे समोर येत असतात. अशाच एका सर्व्हेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन वाढवले आहे. एक खासगी वृत्तवाहिनी आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार या निवडणुकीचा निकाल अजित पवार यांच्या पक्षासाठी धक्कादायक ठरू शकतो. याबाबत अजित पवार यांनाच विचारले असता, हा तर निव्वळ अंदाज आहे. ज्या दिवशी निकाल लागेल त्यादिवशी बघा, असं अजित पवार म्हणाले. (Lok Sabha Election 2024 zero seats for ncp in maharashtra ajit pawars first reaction to the opinion poll)

मतदारांचा कौल काय?

महायुतीतील जागावाटपानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चार जागांवर लढत आहेत. एबीपी माझा – सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुती ३० जागांवर विजयी होणार असून मविआला १८ जागा मिळणार आहेत. मात्र, महायुतीला चांगल्या जागा मिळणार असल्या तरी अजित पवार यांना चारपैकी एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज या सर्व्हेतून समोर आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच जागांवर विजय मिळणार आहे. याबाबतच पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हे केवळ अंदाज असतात. जेव्हा निकाल लागेल तेव्हा बघा, असं उत्तर दिलं. यासोबतच महायुतीसाठी सध्या पोषक वातावरण असल्याचंही ते म्हणाले. पहिल्या टप्प्याचे मतदान लवकरच होणार आहे. तेथील वातावरण पूर्णपणे आमच्या बाजूने असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई…, फडणवीसांचे सुनेत्रा पवारांबद्दल वक्तव्य

बारामतीचा निर्णय एकतर्फी लागणार?

पूर्वापार पवार कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामती मतदार संघावर यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या येथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या समोर राष्ट्रवादीतून बाहेर पडत पक्ष, चिन्ह आणि पक्षाचे नाव स्वतःकडे घेतलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. या दोघीनींही गुरुवारी आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थोडक्यात, इथे नणंद आणि भावजय असा सामना रंगणार आहे. त्यामुळेच राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. पीपल्स इनसाईट आणि पोलस्ट्रॅटने तसेच सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार, ही जागा सुप्रिया सुळे राखतील. हा अजित पवार यांच्यासाठी आणखी एक धक्का असू शकतो. याशिवाय अमोल कोल्हे शिरुरमध्ये आढळराव पाटील यांचा पराभव करतील. रायगडमध्ये देखील सुनील तटकरे यांना पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव करणार असल्याचा अंदाज आहे. (Lok Sabha Election 2024 zero seats for ncp in maharashtra ajit pawars first reaction to the opinion poll)

- Advertisement -

विरोधकांना किती जागा?

पीपल्स इनसाईट आणि पोलस्ट्रॅटच्या सर्व्हेनुसार, काँग्रेस, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्ष या तिघांच्या आघाडीला अर्थात महाविकास आघाडीला या निवडणुकीत 20 जागा मिळू शकतात. यात शिवसेना – उद्धव गटाला 10 जागा मिळण्याचा अंदाज असून तो सर्वात मोठा पक्ष असेल. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी – शरद पवार गट यांना 5 – 5 जागा मिळू शकतात. (Lok Sabha Election 2024 zero seats for ncp in maharashtra ajit pawars first reaction to the opinion poll)

हेही वाचा – Lok Sabha : पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज; दिग्गज नेत्यांचे भविष्य मतपेटीत होणार बंद


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -