घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : बारामतीच्या लढाईला आज खऱ्या अर्थाने सुरुवात; सुप्रिया सुळे,...

Lok Sabha 2024 : बारामतीच्या लढाईला आज खऱ्या अर्थाने सुरुवात; सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार

Subscribe

पुणे – बारामती लोकसभेच्या खऱ्या लढाईला आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज (18 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांच्यासह आज सकाळी दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर अजित पवारांनी सांगितले की, देवाकडे यश आणि विजय मागितला.

- Advertisement -

बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पूर्वी त्यांनी पती अजित पवारांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली. त्यांच्याविरोधात नणंद खासदार सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्या देखील आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दगडुशेठ हलवाई गणपती पूजेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून यावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली.
काम आणि मेरिटच्या आधारावर लोक निवडून देतील, सुप्रिया सुळेंना विश्वास

- Advertisement -

सुप्रिया सुळेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जनता जनार्दन काम आणि मेरिटच्या आधारावर मला निवडून देतील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला. बारामतीमध्ये सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. पिण्याचे पाणी असेल किंवा शेतीसाठी पाण्याची गरज आहे. मतदारसंघातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. मतदारसंघातील पाण्याची समस्या सोडवण्याला माझे प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांची भावजय सुनेत्रा अजित पवार आहेत. त्यासंबंधी बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या विरोधात देशातील सर्वच विरोधीपक्ष एकत्र झाला आहे.

हेही वाचा : Pawar Vs Pawar : वाढपी वाढतो म्हणजे त्याने एकट्यानेच स्वयंपाक बनवला असे नाही; राजेंद्र पवारांचा अजितदादांना टोला

Edited By – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -