घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : काश्मीर ते कन्याकुमारी..., लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा...

Lok Sabha Election 2024 : काश्मीर ते कन्याकुमारी…, लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या शुभेच्छा

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज राज्यातील महत्त्वाचे नेतेमंडळी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार आज (18 मार्च) अर्ज भरणार आहेत.

पुणे : लोकसभा निवडणूक 2024 साठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज राज्यातील महत्त्वाचे नेतेमंडळी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघातील पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार आज (18 मार्च) अर्ज भरणार आहेत. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र अर्ज भरण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Lok Sabha Election 2024 Supriya Sule good luck to Sunetra Pawar And Slams Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी नाव न घेता सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या. “जे कोणी काश्मीर ते कन्याकुमारी निवडणूक लढणार आहेत, ते लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे कश्मीर ते कन्याकुमारी निवडणूक लढणाऱ्या प्रत्येकाला माझ्याकडून शुभेच्छा”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या. पण सुप्रिया सुळेंच्या दिलेल्या शुभेच्छांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

राम कृष्ण हरी वाजवा तुतारी; अजित पवारांवर सुप्रिया सुळेंची टीका

याशिवाय सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बातचीत करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांनी आपल्या भाषणा दरम्यान उपस्थितांना बटण दाबण्यास सांगितले होते. त्यावेळी अजित पवारांनी कचाकचा बटण दाबा असे वक्तव्य केले होते. त्यावरून अनेकांनी अजित पवारांलक टीका केली. अशात, “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांवर टीका केली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : बारामतीच्या लढाईला आज खऱ्या अर्थाने सुरुवात; सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार

- Advertisement -

दरम्यान, सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या, असेही वक्तव्य अजित पवारांनी केले होते. त्यावरही सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. “सातत्याने आरोप करायचे आणि पळून जायचे. पण आज कोण कुठे उभा आहे, त्या महत्व जास्त आहे. सातत्याने हे तेच बोलत असतात. ही निवडणूक शरद पवारांची आहे की देशाची आहे. पण एक निश्चित आहे की शरद पवारांवर टीका केल्यावर हेडींग बनते. याचाच अर्थ असा की तेच नाणं दहा वर्ष टिकलं आहे. आब्यांच्याच झाडाला लोकं दगड मारत असतात”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी टीका केली.

त्याचप्रमाणे “कदाचित त्यांनी (अजित पवार) माझा मराठीतील कार्य अहवाल वाचलेला नाही. मी आजचं त्यांना माझा कार्य अहवाल वाचण्यासाठी पाठवीन. त्यानंतर मला विश्वास आहे की, त्यांना थोडासा जरी वेळ काढला माझा कार्य अहवाल वाचण्यासाठी तर ते नक्कीच मला मतदान करतील”, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : वयाची भाषा करणाऱ्यांनी…, रोहित पवारांचे अजित पवार गटाला आव्हान

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -