घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : शक्तीला संपवण्याचे स्वप्न धुळीला मिळेल; फडणवीसांचा राहुल गांधीवर...

Lok Sabha 2024 : शक्तीला संपवण्याचे स्वप्न धुळीला मिळेल; फडणवीसांचा राहुल गांधीवर निशाणा

Subscribe

Lok Sabha Election 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरूवात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून केली. चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप आणि महायुतीला कोणीच थांबवू शकत नाही. हा हुंकार पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी भरलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आशिर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवले. आता चंद्रपुरचे यान आपले उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि पंतप्रधा मोदींच्या आशिर्वादाने थेट संसदेत उतरणार आहे.

चंद्रपूर : जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही. कारण शक्ती म्हणजे आई आणि ज्या आईच्या पोठी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला तुम्ही कधीच संपवू शकणार नाहीत. त्यामुळे आई महाकालीला संपवण्याचे तुमचे स्वप्न धुळीला मिळेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 The dream of ending Shakti will be dashed Devendra Fadnavis targets congress leader rahul gandhi)

चंद्रपुरात आज (8 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेपूर्वी भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “आई महाकालीला आपण सगळ्यांनी नमन केले आहे. एकिकडे आई महाकालीला नमन करणारा आपला पक्ष आणि महायुती आहे तर, दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात की, मला हिंदू समाजात जिला शक्ती म्हटले जाते, ती शक्तीच मला संपवायची आहे. पण राहुल गांधींना सांगा की, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही. कारण शक्ती म्हणजे आई आणि ज्या आईच्या पोठी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला तुम्ही कधीच संपवू शकणार नाहीत. त्यामुळे आई महाकालीला संपवण्याचे तुमचे स्वप्न धुळीला मिळेल”, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले – मी कोणाचे ऐकून घेणार नाही

याशिवाय, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरूवात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून केली. चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप आणि महायुतीला कोणीच थांबवू शकत नाही. हा हुंकार पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी भरलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आशिर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवले. आता चंद्रपुरचे यान आपले उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि पंतप्रधा मोदींच्या आशिर्वादाने थेट संसदेत उतरणार आहे. त्याच यानात आपले अशोक नेतेही बसलेले असतील. हे दोन्ही नेते तुमच्या आशिर्वादाने देशाच्या संसदेमध्ये पोहोचणार आहेत”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, “आमदार आणि मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरचा पूर्ण कायापालट केला आहे. त्यासोबत अशोक नेते यांनी गेली 10 उत्तमप्रकारची सेवा केली आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : जाहीरनामा नव्हे त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे; मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -