घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : मोदी विरुद्ध जनता अशी ही निवडणूक ; प्रकाश...

Lok Sabha 2024 : मोदी विरुद्ध जनता अशी ही निवडणूक ; प्रकाश आंबेडकरांचा काय आहे दावा?

Subscribe

Lok Sabha Election 2024 : कोणताही सक्षम विरोधी पक्ष नसल्याने आगामी लोकसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध जनता अशी असणार आहे. देशातील जनतेनेच मोदींना हरवण्याचा निश्चय केल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. कोणताही सक्षम विरोधी पक्ष नसल्याने आगामी लोकसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध जनता अशी असणार आहे. देशातील जनतेनेच मोदींना हरवण्याचा निश्चय केला आहे, असेही ते म्हणाले. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. (Lok Sabha 2024 : prakash ambedkar predicts india alliance does not have strength to defeat pm modi in lok sabha election)

पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर…

या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा – संघाची सत्ता पुन्हा आली तर ते राज्यघटना निश्चितच बदलू शकतात. कारण लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही. भाजपाची चारसौ पारची घोषणा म्हणजे राज्यघटना बदलण्याच्या ध्येयाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाही रुचत नाही. त्यांची मानसिकता आणि कार्यपद्धती लोकशाहीपासून वेगळी असल्याचे देखील आंबेडकर म्हणाले. संघ आणि संघाशी संबंधितांचा जाती-पातीवर जास्त विश्वास आहे. आणि भारताची राज्यघटना त्यांच्या या विचारसरणीला मारक असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. आरएसएस आणि भाजपाला 2029 मधील विजयाची शाश्वती नाही. त्यामुळेच 2024 मध्ये सत्तेत आल्यानंतर ते राज्यघटना बदलून टाकतील आणि चीनप्रमाणे एकल पक्षाचे शासन ठेवतील. ज्यायोगे, 2029 मध्ये त्यांना पराभवाचा धोका राहणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

सक्षम विरोधी पक्षाचा अभाव

मोदी विरोधी आघाडी अर्थात इंडि आघाडीच्या क्षमतेवर प्रकाश आंबेडकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मोदींना हरवणे या आघाडीला शक्य नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. सध्या कोणताही सक्षम विरोधी पक्ष नाही. मात्र, तरीही आता जनतेनेच मोदींना हरवण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळेच ही निवडणूक मोदी विरुद्ध जनता अशी होणार आहे. (Lok Sabha 2024 : prakash ambedkar predicts india alliance does not have strength to defeat pm modi in lok sabha election)

आम्ही भाजपाची बी टीम नाही

प्रकाश आंबेडकर स्वतः महाराष्ट्रातील अकोला येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. इंडि आघाडीत तुम्ही सहभागी का झाला नाहीत तसेच तुम्ही भाजपाची बी टीम म्हणून काम करता का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. इंडि आघाडीतील सहभागाविषयी ते म्हणाले की, मविआमध्ये सहभागी होण्यास मी तयार होतो. मात्र, मला त्यांनी केवळ दोनच जागांचा प्रस्ताव दिला. हे मी का मान्य करावे? दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने मविआमध्ये सहभागास नकार दिला आहे. ते स्वतंत्र लढणार असून काही ठिकाणी त्यांनी मविआतील काही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. (Lok Sabha 2024 : prakash ambedkar predicts india alliance does not have strength to defeat pm modi in lok sabha election)

- Advertisement -

Edited by Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -