घरमहाराष्ट्रLPG Rate: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; असे आहेत नवे दर

LPG Rate: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; असे आहेत नवे दर

Subscribe

जाणून घ्या नवे दर नेमके किती आहेत...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक लोकं कमी पगारात आपले घर चालवत आहेत तर काही बेरोजगारही झाले आहे. दरम्यान सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा कोलमडणारी बातमी समोर आली आहे. ऑईल कंपन्यांनी एलपीजी गॅस अर्थात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे.

दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपये प्रति सिलिंडर वाढ झाली आहे. तर ५ किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत १८ रूपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत विना अनुदानित १४.२ किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढून ५९४ रुपये झाली आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये १५ दिवसांमध्ये ही दुसरी वाढ आहे. याशिवाय, १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या भावात ३६.५० रुपयांची वाढ झाली आहे. नव्या किंमती आजपासून लागू झाल्या आहेत. यापूर्वी, तेल कंपन्यांनी ३ डिसेंबरला गॅस सिलिंडरच्या भावात ५० रुपयांची वाढ केली होती. दिल्लीमध्ये बिनासबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरची किंमत ६४४ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ही किंमत ६७०.५० रुपये, मुंबईत ६४४ रुपये आणि चेन्नईमध्ये ६६० रुपये झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवितात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे १ डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. यानुसार घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात नोव्हेंबरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नव्हता. तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

येथे चेक करा एलपीजी सिलिंडरचे दर

स्वयंपकाच्या गॅसचे दर चेक करण्यासाठी सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जा. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन रेट जारी करतात. https://iocl.com/TotalProductList.aspx या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे रेट चेक करू शकता.


यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -