घरमहाराष्ट्रधुळ्यात भाजप पुन्हा नंबर १ - दानवे

धुळ्यात भाजप पुन्हा नंबर १ – दानवे

Subscribe

धुळे व अहमदनगर येथे भाजपाच्या विजयासाठी परिश्रम करणाऱ्या पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो, असंही रावसाहेब दानवे म्हणले. 

‘धुळे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ७४ पैकी ५० तर अहमदनगर महानगरपालिकेत १४ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष पुन्हा यशस्वी पक्ष ठरला. या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो’, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी आज (सोमवारी) व्यक्त केली. आज निकाल जाहीर झालेल्या सहा नगरपालिका, नगरपंचायतींपैकी लोहा (नांदेड), शेंदुर्णी (जळगाव) व मौदा (नागपूर) ही 3 नगराध्यक्षपदं आणि सर्वाधिक ३७ नगरसेवकपदं जिंकून भाजप पहिल्या क्रमांकावर राहिल्याचे दानवे यावेळी म्हणाले. दानवे यांनी यावेळी सांगितले की, धुळे महानगरपालिकेत भाजपने गेल्या वेळच्या ३ जागांवरून झेप घेतली आणि ५० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. अहमदनगर महापालिकेत मागील वेळेच्या ९ जागांवरून वाढ होऊन, १४ जागा भाजपाला मिळाल्या. धुळे व अहमदनगर येथे भाजपाच्या विजयासाठी परिश्रम करणाऱ्या पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो, असंही ते म्हणले. 


वाचा: धुळे महापालिकेत भाजपचेच ‘अच्छे दिन’


यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाची यशाची मालिका चालू आहे. धुळे – अहमदनगर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ही मालिका कायमच राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे काम तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली बळकट झालेली पक्ष संघटना यामुळे पक्षाला पुन्हा पुन्हा यश मिळत आहे. २०१५ पासून आजपर्यंत राज्यात सर्व २७ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असून, त्यामध्ये भाजपाने सर्वाधिक ११०० जागा जिंकल्या आहेत. भाजपाविरोधी पक्षांच्या एकूण जागाही भाजपाएवढ्या नाहीत, असंही दानवेंनी यावेळी स्पष्ट केलं.

- Advertisement -

‘शिवसेना सोबत राहावी’; रावसाहेब दानवेंची इच्छा


दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील २७ पैकी २६ महानगरपालिकांमध्ये भाजपाच्या नगरसेवकांची संख्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे, तर एका महानगरपालिकेत ही संख्या कायम राहिली. २७ पैकी सोळा महानगरपालिकांमध्ये यापूर्वी भाजपा स्वबळावर किंवा युतीच्या माध्यमातून सत्तेवर आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आज धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकांमध्ये यश मिळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -