घरमहाराष्ट्रMahad Building Collapse : बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल - पालकमंत्री...

Mahad Building Collapse : बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल – पालकमंत्री आदिती तटकरे

Subscribe

महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवार, २४ ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या दूर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य ७ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येईल, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केल्याचे तसेच दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही २६ लोक अडकले असून त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची पथके श्वानपथकाच्या मदतीने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला आजपासून सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -