घरताज्या घडामोडीमहात्मा गांधींचा अवमान झाल्यानंतर राज्य सरकार हातावर हात ठेवून गप्प बसलंय, सुधीर...

महात्मा गांधींचा अवमान झाल्यानंतर राज्य सरकार हातावर हात ठेवून गप्प बसलंय, सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात

Subscribe

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात संत कालीचरण महाराज यांनी अपशब्द उच्चारले आहेत. यामुळे महात्मा गांधी यांचा अवमान झाला आहे. कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही उमटले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर गृहमंत्री अमित शाह यांनी कारवाई करण्याची मागणी केली. यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घणाघात केला आहे. राज्य सरकारमध्ये असताना तुम्हीच कारवाईची मागणी करत आहेत. यामुळे मलिकांनी माफी मागितली पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, सभागृह सहमत आहे. विधानसभा सदस्य आज नाहीत तेही नवाब मलिकांच्या विधानाला सहमत असतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संबंधात वाईट शब्दाचा उपयोग गेला. त्याच्यामुळे महात्मा गांधी यांचा अवमान झाला तर त्याला शिक्षा दिली पाहिजे असे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांनी माफी मागावी

एक प्रश्न उपस्थित झाला आहे. तुम्ही स्वतः मंत्री आहात, कारवाई करण्याची जबाबदारी तुमची आहे. बाकी वेळी आम्ही सामूहिक आणि आता गृहमंत्र्यांची जबाबदारी, खर तर नवाब मलिकांनी माफी मागितली पाहिजे या राज्यात महात्मा गांधी यांचा अपमान झाल्यानंतर राज्य सरकार हातावर हात घेऊन गप्प बसत आहे. हे सभागृहाची वाट पाहत आहेत. १५ हजार कोटी पोलिसांवर खर्च करतो आहे. मारा ना या लोकांचे पालन पोषण तुम्ही केले आहे. का नाही अटक केली? पोलीसांनी का अटक का केली नाही असा माझा प्रश्न असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंकडून कारवाईची मागणी

कालीचरण नावाच्या राष्ट्रद्रोही व्यक्तीने ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचा अवमान केले आणि गोडसेंचा जयजयकार केला. असे वक्तव्य करुन हिंदू विचारांच्या महात्मा गांधींना शिव्या घालण्याचे पाप हिंदूवादी करत आहेत. पुढील काळात असे वक्तव्य करु नये यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. योगायोगाने महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील आहे. अशा व्यक्तीला तातडीने पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महात्मा गांधींबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी संत कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -