घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंचे गुरू होते आप्पासाहेबांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी

मुख्यमंत्री शिंदेंचे गुरू होते आप्पासाहेबांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वतः ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले होते.

राज्य शासनाचा २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ही घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वतः ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रद्धाळू राजकीय नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या कपाळावर नेहमी लाल कुंकूचा टिळा लावलेला दिसून येतो. अप्पासाहेब धर्माधिकारी हे अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असून महाराष्ट्रातील जाणते समाजसेवक आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरू मानत. नानासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधन करत असतात. २०१४ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. २०१७ मध्ये त्यांनी चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

राज्यातील सर्वच पक्षातील अनेक नेते धर्माधिकारी कुटुंबाला आपलं गुरू मानतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ते गुरू आहेत. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या मनात असलेला आदर वेळोवेळी दिसून येत होता.

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -