Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी HSC Result 2021: सोमवारी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता

HSC Result 2021: सोमवारी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता

Related Story

- Advertisement -

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या (HSC Result 2021) बारावीच्या निकालाकडे लागले आहे. आता महाराष्ट्र बोर्डाचा हा बारावीचा निकाल २ ऑगस्टला सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज दुपारी बोर्डाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची खूप उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जुलैच्या अखेरस लागण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्याने बारावी निकाल जाहीर करण्यास ऑगस्ट महिना उजाडला आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे निकाल निश्चित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक जाहीर झाले आहेत. ते कसे मिळवायचे जाणून घ्या…

- Advertisement -

सर्वप्रथम http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जायचे.
त्यानंतर तिथे तुमचा जिल्हा आणि तालुका टाकायचा.
मग तुमचे संपूर्ण नाव टाकायचे. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर उपलब्ध होईल.

इयत्ता दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. आता बारावीचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर आधारित असणार आहे. यामध्ये दहावी, अकरावीसाठी प्रत्येकी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – १२ वी सीबीएसई बोर्डाचा निकाल ९९.३७ टक्के


- Advertisement -