घरमहाराष्ट्रMaharashtra Budget 2022 : एसटी महामंडळासाठी मोठी घोषणा! ३००० बसेसची करणार खरेदी

Maharashtra Budget 2022 : एसटी महामंडळासाठी मोठी घोषणा! ३००० बसेसची करणार खरेदी

Subscribe

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. दरम्यान राज्य सरकारने वेतन वाढ आणि वेतन निश्चितीची अट मान्य झाल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली. मात्र अद्याप काही कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून अडून आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबतच्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्येही या मुद्दा अद्याप सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी काही आर्थिक तरतूदी जाहीर केल्या आहे.

एसटी महामंडळासाठी ३००० बसेसची खरेदी

- Advertisement -

अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकरिता 3 हजार नवीन पर्यावरण पूरक बसगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद केली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण,दर्जावाढ आणि पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून भांडवली अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

सन 2022-23 या वर्षासाठी परिवहन विभागाला अर्थसंकल्पात 3 हजार 3 कोटींची तरतूद यंदाच्या केली आहे. तर यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 4 हजार 107 कोटी रूपये आर्थिक मदतीची तरतूद केली आहे.

- Advertisement -

रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी 100 कोटींची तरतूद 

रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्याचे सरकारने निश्चित केले असून अमरावती विमानतळावर रात्रीची उड्डाण सुविधा सुरू करण्यासाठी नवीन टर्मिनलच्या इमारतीची उभारणी व धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे  काम हाती घेण्यात येत आहे.कोल्हापूर विमानतळाकर‍िता आवश्यक जमिनीचे भूसंपादन व न‍िर्वनीकरणाचीकामे हाती घेण्यात आली आहेत. गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.असही अर्थमंत्री अजित पवार म्हणालेय

शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन माल वाहतुकीकरीता स्वतंत्र टर्मिनल उभारण्याचे प्रस्तावित असून रात्रीच्या उड्डाणाची सुविधाही लवकरच सुरु करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळाच्या कामाकरिता 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. असेही त्यांनी जाहीर केले.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -