घरताज्या घडामोडीMaharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी दिली कवितेची जोड

Maharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी दिली कवितेची जोड

Subscribe

महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प २०२२-२३ सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अजित पवारांनी विविध विभागासाठी मोठ-मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी कवितेची जोड दिली. यावेळी कोण-कोणत्या कविता अजित पवारांनी ऐकवल्या वाचा.

बैलाला आपण शेती आणण शेतकऱ्याचं वैभव मानतो. कवी विठ्ठल वाघ यांच्या शब्दात सांगायचं तर,

- Advertisement -

बैल घामाची प्रतिमा,
बैल श्रमाचे प्रतिक,
बैल माझ्या शिवारात…
काढी हिरवे स्वस्तिक.

कोविडच्या काळात आपल्या सरकारने बजावलेल्या कामगिरीचं देश- विदेशात कौतुक झालं. राज्यातल्या कोरोनायोद्यांनी जीवाची जोखीम पत्करुन सेवा दिली. याचे वर्णन करताना अजित पवारांनी कविता सादर केली.

- Advertisement -

निष्ठेने केली सेवा,
ना केली कधी बढाई,
दिला शब्द राज्याला,
की धैयाने जिंकू लढाई…
लढाई लढतानाही…
विजयाची जागवली आशा,
देशानं पाहिलं अवघ्या…
आम्ही योग्य दाखवली दिशा…

ज्ञान उजळले घरात माझ्या, घर झाले सोनेरी…
रस्ता नव्हता सोपा, हा पण होता गं काटेरी,
डगमगली ना तरी कधी ती, पुढे चालली बाई…
शिकविते देऊनी विश्व हातावर, सावित्रीआई…

महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीतील संत जगनाडे महाराजांचं स्थान आपल्याला
चांगलं माहित आहे…

आमुचा तो घाणा, त्रिगुण तीळाचा,
नंदी जोडियेला, मन पवनाचा,
भक्ती हो भावाची, लाट टाकियली,
शांतीशीळा ठेविली, विवेकावरी…
असे म्हणणाऱ्या…..

अर्थसंकल्पाचा समारोप करताना अजित पवार म्हणाले की, राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची उद्या १२ मार्च रोजी जयंती आहे. प्रसिद्ध गीतकार सुधीर मोघे चव्हाण म्हणाले होते की,

तू नेता…योद्धा वीर राष्ट्रसंग्रामी,
तू राजधुरंधर, माणूस अंतर्यामी,
तू लेखक, वक्ता, रसिक स्वयंप्रज्ञेचा,
तू जणू प्राण, यशवंत महाराष्ट्राचा…..


हेही वाचा – Maharashtra Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवांसाठी 11 हजार कोटींची तरतूद; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -