Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: चिंता वाढली! २४ तासात ९,८४४ नवे रुग्ण, १९७ मृत्यू

Maharashtra Corona Update: चिंता वाढली! २४ तासात ९,८४४ नवे रुग्ण, १९७ मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप असला तरी राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. बुधवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा आकडा पार केला असून राज्यात १०,०६६ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर आज बाधितांमध्ये काहिशी घट झाल्याचे बघायला मिळाला. गेल्या २४ तासात ९,८४४ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ६०,०७,४३१ झाला आहे. तर काल बुधवारी १६३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर आज कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असून १९७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.

राज्यातील Recovery Rate ९५.९३ टक्क्यांवर

आज राज्यात ९,८४४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९,३७१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण ५७,६२,६६१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९३ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०३,६०,९३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,०७,४३१ (१४.८८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३२,४५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू

- Advertisement -

आज नोंद झालेल्या एकूण १९७ मृत्यूंपैकी १४९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५९ ने वाढली आहे. हे ३५९ मृत्यू, पुणे ६९, नाशिक ५४, औरंगाबाद ४९, लातूर ४७, ठाणे २९, अहमदनगर २८, सांगली १३, अकोला १०, नागपूर ८, परभणी ७, सातारा ७, धुळे ६, रत्नागिरी ५, सिंधुदुर्ग ५, जळगाव ४, कोल्हापूर ४, उस्मानाबाद ३, यवतमाळ ३, बीड २, बुलढाणा २, रायगड २, जालना १ आणि सोलापूर १ असे आहेत.


BMC चं पहिलं स्वयंचलित वाहनतळ; २१ मजलींसह २४० वाहन क्षमतेचे ‘पार्किंग’ मुंबईकरांच्या सेवेत

- Advertisement -
- Advertisement -
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -