घरमहाराष्ट्रMaharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात २५,८३३ कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा उद्रेक, २४ तासात २५,८३३ कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

२४ तासात ५८ कोरोना रुग्णांचा मृत्यू

आज राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एका दिवसात आढळले होते. आज २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना मागील महिन्यापासून दररोज १० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असल्यामुळे प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असली तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासात २५,८३३ कोरोना रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज १२,१७४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.७९ % एवढे झाले आहे.

मागील २४ तासात ५८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा २.२२ टक्के एवढा आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५० हजारहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७९,५६,८३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,९६,३४० (१३.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,१३,२११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने उद्रेक केला. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने अडीज हजारांचा टप्पा पार केला. आज मुंबईत २ लाख ८७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर मुंबईत आज १ हजार १९३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आज ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १८ हजार ४२४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -