Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: २४ तासात राज्यातील बाधित आणि मृत्यूच्या संख्येत किचिंत घट,...

Maharashtra Corona Update: २४ तासात राज्यातील बाधित आणि मृत्यूच्या संख्येत किचिंत घट, ७,४६७ कोरोनामुक्त

राज्यात गेल्या २४ तासात ६ हजार ९५९ नव्या रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. राज्यात लावण्यात आलेल्या निर्बधांमुळे कोरोना रुग्णांसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील कमी झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील नियमांना शिथिलता देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यात गेल्या २४ तासात २२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत मृत्यूसंख्येत किंचिंत घट झाली आहे. काल राज्यात कोरोनामुळे २३१ जणांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या ६ ने घटली आहे. राज्यात आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या १ लाख ३२ हजार ७९१ इतकी आहे.

- Advertisement -

राज्यातील बाधित रुग्णांचा विचार केला असता राज्यात बाधितांची संख्या देखील कालच्या तुलनेत किचिंत वाढली आहे. राज्यात गेल्या २४ तासात ६ हजार ९५९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ६ हजार ६०० इतकी होती. राज्यातील आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ६३ लाख ३ हजार ७१५ इतकी आहे.

देशात कोरोनामुळे मृत्यूसंख्या वाढत असली तरी रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यात गेल्या २४ तासात ७ हजार ४६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६० लाख ९० हजार ७८६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांचा विचार केला असता राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील सर्वाधिक आहे. राज्यात सध्या ७६ हजार ७५५ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update: गेल्या २४ तासात ३४६ नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ

- Advertisement -