घरमहाराष्ट्रलाभार्थ्यांची यादी कुठे आहे?, काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल

लाभार्थ्यांची यादी कुठे आहे?, काँग्रेस नेत्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागणार असल्याचं घोषित केलं. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी पॅकेज घोषित केलं. या पॅकेजवर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्यांना पॅकेज दिलं आहे, त्या लाभार्थ्यांची यादी कुठे आहे? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करत सरकारच्या पॅकेजवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “५ लाख फेरीवाले, १२ लाख रिक्षाचालक, बांधकाम कामगार यांच्या खात्यात एक ते दीड हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या कामगारांचे आधारशी संलग्नित बँक खाती आहेत का? लाभार्थी कामगारांची यादी कुठे आहे? गरीबांसाठी घोषित केलेल्या पॅकेजवर दुसराच कुणीतरी डल्ला मारणार?” असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

- Advertisement -

फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेरीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -