घरमहाराष्ट्रअकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी नव्वदीच्या घरात

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी नव्वदीच्या घरात

Subscribe

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 4 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जाहीर झाली. दुसर्‍या यादीत 1 लाख 39 हजार 794 जागांसाठी अर्ज केलेल्या 1 लाख 33 हजार 723 विद्यार्थ्यांपैकी 60 हजार 37 विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेतील सर्वाधिक 37 हजार 186 विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या. त्याखालोखाल विज्ञान शाखेतील 17 हजार 333 आणि कला शाखेतील 5125 विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाला. दुसरी गुणवत्ता यादी 90 टक्क्यांच्या घरातच असून, पहिल्या यादीच्या तुलनेत चार ते पाच टक्क्यांनी घट झाली आहे.

यंदा गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पहिली गुणवत्ता यादी 90 टक्क्यांच्या पुढेच होती. त्यातही नामांकित महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी 95 टक्क्यांवरच होती. त्याचप्रमाणे नामांकित महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी 90 टक्क्यांच्या घरातच राहिली असून काही महाविद्यालयांमधील गुणवत्ता यादी ही 85 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दुसर्‍या गुणवत्ता यादीमध्येही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. पहिल्या यादीमध्ये अ‍ॅलॉट झालेल्या 1 लाख 17 हजार 883 जागांवर अवघ्या 58 हजार 506 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. त्यातही पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्याचे प्रमाण अधिक होते.

- Advertisement -

पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या 10 हजार 515 विद्यार्थ्यांनी तर दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या 9997 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याने दुसर्‍या यादीमध्ये नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची आशा निर्माण झाली होती. त्यानुसार दुसर्‍या गुणवत्ता यादीमध्ये अर्ज केलेल्या 1 लाख 33 हजार 723 विद्यार्थ्यांपैकी 60 हजार 37 विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या. यामध्ये एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या 55 हजार 664, सीबीएसई मंडळाचे 1573, आयसीएसई 2131आणि अन्य मंडळातील 669 विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 48 हजार 841, एससी 4889, एसटी 328, एनटी 1008, ओबीसी 4180, विशेष मागास प्रवर्ग 433 तर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 109 विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाली. दुसर्‍या यादीमध्ये 13 हजार 282 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे तर 11 हजार 75 विद्यार्थ्यांना दुसर्‍या पसंतीचे, 8398 विद्यार्थ्यांना तिसर्‍या, 7127 विद्यार्थ्यांना चौथ्या क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

शाखा सादर अर्ज अ‍ॅलॉटमेंट झालेले विद्यार्थी
कला 9891 5125
वाणिज्य 80758 37186
विज्ञान 42467 17333
एमसीव्हीसी 607 393
एकूण 133723 60037

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -