Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ... तर भाजपची संपूर्ण ताकद भुजबळांच्या पाठीशी : बावनकुळे

… तर भाजपची संपूर्ण ताकद भुजबळांच्या पाठीशी : बावनकुळे

Related Story

- Advertisement -

ओबीसींना आरक्षण मिळु द्यायचे नाही म्हणून सरकारकडून कटकारस्थान रचले जात आहे. फक्त तीन महिन्यांत आरक्षणाचा डेटा तयार होऊ शकतो. त्यांच्याकडून ओबीसी आरक्षणाला मुददाम उशीर केला जात आहे. नाही म्हणायला भुजबळ या प्रश्नावर आंदोलन करत आहेत परंतु हा केवळ दिखाऊपणा असून त्यांना तर खरंच आबीसींचा कळवळा असेल तर त्यांनी इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. परंतु भुजबळ, वडेटटीवार समाजाची फसवणूक करत आहेत. त्यांनी जर या प्रश्नी पुढाकार घेतला तर, भाजपची संपुर्ण ताकद आपण त्यांच्या पाठीशी उभी करू असे सांगत भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होउ देणार नाही असा इशारा दिला.

नाशिक येथे पत्रकार परिषदेप्रसंगी बोलतांना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर भुजबळ, नाना पटोले यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांना सांगितले की, ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश लॅप्स होत आला असल्याचे सांगितले. त्यांनी त्यावर काम केलं नाही. परंतु आता त्यांच्या अंगावर येत असल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. मी भुजबळांचा आदर करतो परंतु त्यांनी समाजाची फसवणूक करू नये. भुजबळ सांगत आहेत की, केंद्र सरकारने इंपरीकल डाटा द्यावा, परंतु 2010 साली काँग्रेसच्या काळात जनगणना झालेली आहे. ती जातिनिहाय जनगणना झालेली नसल्यामुळे हा डाटा महाराष्ट्र सरकारलाच तयार करावा लागणार आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी आपले हात झटकू नये’, असे ते म्हणाले. तसेच या सरकारला मुळातच ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -