घरताज्या घडामोडीMaharashtra Lockdown 2021: येत्या १ ते २ दिवसात कोल्हापुरात कडक लॉकडाऊन लावणार...

Maharashtra Lockdown 2021: येत्या १ ते २ दिवसात कोल्हापुरात कडक लॉकडाऊन लावणार – हसन मुश्रीफ

Subscribe

राज्यात कोरोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तर काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यापैकी एक जिल्ह्या म्हणजे कोल्हापूर. सध्या कोल्हापुर जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोनाचा मृत्यूदर आहे. याच अनुषंगाने येत्या १ ते २ दिवसात कोल्हापुरात कडक लॉकडाऊन लावणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापुरची परिस्थिती बिघडत झाली आहे. देशातील सर्वात जास्त मृत्यूदर कोल्हापुरात आहे. गेल्या ७ ते ८ दिवसांपासून मृत्यूदर कसा कमी होईल, याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता कडकडीत लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. १० ते १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार असून यामध्ये दूध आणि मेडिकल सोडून सर्व काही बंद राहिला. येत्या २ दिवसांत जिल्ह्याधिकाऱ्यांशी बैठक घेऊन अंतिम घोषणा केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

- Advertisement -

राज्यात पाहायला गेले तर पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोल्हापुरसह, सातारा, सांगली, सोलापुरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे सातारा, सोलापुरमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात काल (रविवार) ४८ हजार ४०१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५७२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर ६०,२२६ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत.


हेही वाचा – २०१५ पासून चीनची कोरोना विषाणूच्या निर्मितीची तयार सुरू, ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चा दावा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -