घरमहाराष्ट्रछत्रपतींचं, बाळासाहेबांचं नाव घेताना महाराष्ट्राचा रुबाब टिकवा; भाई जगताप विधान परिषदेत आक्रमक

छत्रपतींचं, बाळासाहेबांचं नाव घेताना महाराष्ट्राचा रुबाब टिकवा; भाई जगताप विधान परिषदेत आक्रमक

Subscribe

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज विधानपरिषदेत मुंबईतील आरे मेट्रो कारशेड, रायगडमधील श्रीवर्धनमध्ये सापडलेल्या एके ४७ बंदुकांवरून आणि आमदारांच्या बंडखोरीवरून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी मिळालेल्या वागणुकीवरून काँग्रेसचे आमदार भाई जगताप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाई जगताप यांनी विधानपरिषदेत बोलताना बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

भाई जगताप यांनी महाराष्ट्राचे आर्थिक केंद्र कोणाला खुश करण्यासाठी गुजरातला गेलं? असा प्रश्न उपस्थित करत हा प्रश्न विचारणं माझा अधिकार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रावर अन्याय, आम्ही काय पाहिलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीमध्ये जातात, त्यांचा एक वेगळा आब रुबाब आहे. देशाच्या पंतप्रधानांनंतपर त्यांचे नाव घेतलं जातं, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुठे पाहिले आम्ही, सगळं पाहिलं आम्ही, जर कुणाला उकळ्या फुटत असतील त्रास होत असेल तर होऊ द्या, अस म्हणत पण एवढा त्रास होऊन सुद्धा महाराष्ट्राचा आब रुबाब टिकवूण ठेवा अशी विनंती भाई जगताप यांनी केली आहे. तसेच छत्रपतींच्या, बाळासाहेबांच्या नावाने असं काही तरी करता तेव्हा महाराष्ट्राचा रुबाब टिकवा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान रायगडमधील श्रीवर्धन हरिहरेश्वर समुद्र किनारी सापडलेल्या एके 47 बंदुकांच्या मुद्दावर भाई जगताप यांनी विधानपरिषेद भाष्य करत होते, यावेळी सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी या प्रकरणावरून जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्न विचारत, तावा तावाने बोलणाऱ्यांना एकचं सांगणं आहे एकदा ठरवा आपण पण तावा तावाने बोलू, काही हरकत नाही, त्या टोकाला जाऊ नका. असा इशारा दिला.

मुंबई, महाराष्ट्रावर जेव्हा असे संकट येतं त्यावेळी आपण हे हेतूआरोप करतोय. ही वस्तूस्थिती आहे. ज्या बंदुकां सापडल्या त्यामागे काय हेतू होता हे जनतेसमोर नको यायला. शेखाडीला मिळालेले आरडीएक्स सगळ्या गोष्टी आल्याना जनतेसमोर त्यातील अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत आजही सगळे जेलमध्ये आहेत. असं म्हणत श्रीवर्धन हरिहरेश्वर समुद्र किनारी सापडलेल्या एके 47 बंदुकांमबाबत सरकारने सर्व माहिती जनतेसमोर ठेवावी अशी मागणी केली.


‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, मनसेचं नवं घोषवाक्य


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -