घरताज्या घडामोडीठरलं! लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार

ठरलं! लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार

Subscribe

मुंबई – येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MahavikasAghadi) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. बुधवारी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात लढण्याचं निश्चित झालं आहे. मात्र, स्वराज्य संस्थेतील निवडणुकांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या बैठकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या बैठकीत हजेरी लावली.

हेही वाचा – गावठी दारूच्या विक्रीवर बंदी आणावी; शेकापच्या जयंत पाटलांची विधान परिषदेत मागणी

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत फारकत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाविकास आघाडी अधिक सक्रीय झाली आहे. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनातही सरकारला धारेवर धरलं. त्यातच, काल बुधवारी रात्री महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांबाबत रणनीती आखण्यात आली. येत्या निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याने शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीसाठी महाविकास आघाडी आव्हान ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी महाविकास आघाडीने अजेंडा तयार केला असून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – …अजूनही आरेतील झाडे कापली जाणार; काँग्रेस आमदार भाई जगतापांचा दावा

- Advertisement -

…म्हणून लढवणार एकत्र

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढल्यास भाजपाला बळ मिळेल. त्यामुळे भाजपाला सत्तेतून बाहेर फेकायचं असेल तर महाविकास आघाडीने एकत्र लढणं गरजेचं असल्याचं सिद्ध झालं आहे. तसेच, महाविकास आघाडी एकत्र आल्यास भाजपाला धोका आहे, असं भाजपा नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

हेही वाचा – मनसेच्या सभासद नोंदणीला पुण्यातून सुरुवात, राज ठाकरे ठरले पहिले सदस्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय नाही

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. स्थानिक स्तरावरील इनपूटकडून येणाऱ्या माहितीवर या निवडणुकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही लवकरच लागणार आहेत. या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेविरोधात कंबर कसली आहे. या निवडणुकीत शिवसेना एकटीच लढली तर अनेक ठिकाणच्या जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुंबई पालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना एकटीच लढली तर भाजपाकडे जागा जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून मुंबई पालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता धोक्यात येऊ शकते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -