घरमहाराष्ट्र'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', मनसेचं नवं घोषवाक्य

‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, मनसेचं नवं घोषवाक्य

Subscribe

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. नेहमी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर आक्रमकपणे लढणारी राज ठाकरेंची मनसे आता मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक या नव्या घोषवाक्य देणार आहे. मनसेने आगामी निवडणुका लक्षात घेत सदस्य नोंदणी मोहीम सुरु करणार आहे. आज पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात होणार आहे. मनसेच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी मोहिमेचा शुभारंभ होईल.

दरम्यान 2014 मध्ये मनसे राजकीय स्पर्धेतून मागे पडली, यानंतर आता मनसेने मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत राजकारणात पुन्हा आक्रमक पद्धतीने सक्रिय झाली, यात हिंदुत्वाचा मुद्दाही मनसेने आता लावून धरला आहे. यात आता नव्या घोषवाक्यातून मनसेने मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड दिली आहे. त्यामुळे मनसेची पुढील राजकीय भूमिका यातून स्पष्ट झाली आहे. या मुद्द्यावरून मनसे आता पुन्हा राजकारण आक्रमकपणे सक्रिय होण्यास सज्ज झाली आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेत आता बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. नुकतचं मुंबईत सलग दोन दिवस त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळाव्यांना हजेरी लावली. यात आता राज ठाकरे पुण्यात जाणार आहे. पुण्यातून ते मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा नारळ फोडत आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यभरात मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेने ‘मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक’ हे नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. यापूर्वी मनसेने पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरेंनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य जाहीर केलं आहे.


शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा ,प. पू. युवराज म्हणत डिवचले


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -