घरमहाराष्ट्रअपक्षांमध्ये काही लोकांची वेगळी प्रवृत्ती, काहींची क्षणिक छोट्यामोठ्या कामांबाबत नाराजी - प्रफुल्ल...

अपक्षांमध्ये काही लोकांची वेगळी प्रवृत्ती, काहींची क्षणिक छोट्यामोठ्या कामांबाबत नाराजी – प्रफुल्ल पटेल

Subscribe

मी आरोप-प्रत्यारोपाच्या भानगडीत पडणार नाही. फक्त मी चुकीचे काय हे सांगितले. यावरून सरकारला धोका वगैरे आहे, हे दिवसा तारे पाहण्यासारखे आहे, असं देखील पटेल म्हणाले

“नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदान करता आलं नाही. त्यामुळे फार काही मोठा फरक नाही. अपक्षांमध्ये काही लोकांची वेगळी प्रवृत्ती देखील असू शकते. थोड्या मोठ्या कामासाठी नाराजी असू शकते. त्याच्या खोलात जावं लागेल. पण तिन्ही पक्षांनी व्यवस्थित मतदान केल्याचं निश्चित आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे विजयी उमेकजवार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

पुढे पटेल म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीत दोन भाग आहे, एक तर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष आहेत त्यामध्ये कुठेही मत मिळाली की नाही अशी शंका उपस्थित झाली नाही. तिन्ही पक्षांच्या म्हणजेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या अधिकृत आमदारांनी सर्व उमेदवारांनी दिलेल्या कोट्याप्रमाणे मतदान केले, तिन्ही पक्षांच्या मतांची विचार केल्यास बहुमत होते. अनेक अपक्ष आणि लहान पक्ष आहेत. यात सरकारमधील लहान पक्ष आहेत किंवा सरकारला पाठिंबा ठेणारे लहान पक्ष आहेत, त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना आवर्जुन मतदान केले. मात्र काही अपक्षांची अंदाजे 4-5 मतं मिळाली नाहीत. एक आमचाच मत अवैध ठरला”, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

- Advertisement -

संजय पवारांना 9 मतं ही राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी दिली

“राष्ट्रवादीने 42 मतं घ्यायचं ठरविलं होतं. पण मला 43 व मत कुठे मिळालं याचं संशोधन करावं लागेल. त्यामुळे असू शकेल एखाद्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीने दिलं असेल. राष्ट्रवादी पक्ष आणि आम्ही उर्वरित 9 मतं संजय पवार यांना दिलं आहे. त्यामुळे संजय पवारांना 9 मतं कुणाची दिली तर ती नऊ मत ज्येष्ठ मंत्र्यांची दिली. ती मतं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ यांनी संजय पवारांना दिली”, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

“राज्यसभेत मतपत्रिका दाखवूनचं मतदान करावं लागते. आमच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आपली मतं संजय पवारांना दिलीत. महाविकास आघाडीत सर्वांच ठरलं होतं की, 42 मतं घ्यायचं. त्यानंतर उर्वरित मतं संजय पवारांना द्यायची. तेवढीचं मतं त्यांना मिळाली. नाशिक जिल्ह्याचे आमदार कांदे यांचं एक मत अवैध ठरलं. नाही तर संजय राऊतांनाही 42 मत मिळाली असती. या सर्वांच विश्लेषण होणार आहे. त्यासाठी खोलात जावं लागेल. सकाळी चार वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. रात्री उशीर झाल्याने सगळ्या बाबींचा तपशील होऊ शकला नाही, त्यामुळे एक दोन दिवसांत प्रमुख मंडळी बसून ज्यांनी मतदानाची आकडेवारी बसून स्पष्ट करतील”, असंही पटेल म्हणाले.

- Advertisement -

… हे दिवसा तारे पाहण्यासारखे

“राज्यसभेसाठी दाखविल्याशिवाय मतदान करता येत नाही. गडबड केली, तर कारवाई होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित माणसे बसवली. त्यामुळे कोण फुटले याच्या तपशीलात जाता येईल. बघा मी आरोप-प्रत्यारोपाच्या भानगडीत पडणार नाही. फक्त मी चुकीचे काय हे सांगितले. यावरून सरकारला धोका वगैरे आहे, हे दिवसा तारे पाहण्यासारखे आहे. थोडाफार कामाबद्दल काही आमदारांनी छोटी मोठी नाराजी व्यक्त केली असेल, पण स्वाभाविक आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. अपक्ष आमदार आहेत. त्यात थोडा वेळ लागतो. एक सरकारच्या पक्षात काही नाराजीचे सूर असतात. नागपूरमध्ये एका पक्षात काय चालले हे सांगाची गरज आहे काय”, असा सवालही त्यांनी केला.


अन् महाडिकांना विधान परिषदेच्या पायऱ्यांवरचं मारली लेकाने आनंदाने घट्ट मिठी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -