Maharashtra Political Crisis : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत संभ्रमाचे वातावरण – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra political crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme court) गुरुवारी (11 मे) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra political crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme court) गुरुवारी (11 मे) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून आणि लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे म्हटले. (Maharashtra Political Crisis Creating an atmosphere of confusion regarding the disqualification of 16 MLA says Jitendra Awhad)

राष्ट्रवादी काँग्रेसभवन येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी “16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला असून ते कितीही वेळ घेतील असा संभ्रम निर्माण केला जात आहे”, असे सांगितले.

“पण महाराष्ट्राच्या जनतेला मला काही माहिती द्यायची आहे. 141 पानांचे रूलबुक असून त्या रूलबुकच्या बाहेर विधानसभा अध्यक्षांना जाता येणार नाही. कारण त्यांनी केलेली चर्चा यामध्ये असून त्यावर आम्ही निष्कर्ष काढत आहोत”, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.


हेही वाचा – “शासन आपल्या दारी” कार्यक्रमात कोणाला जबरदस्ती आणलेलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला