Tada!

You subscribed MyMahanagar newsletter successfully.

Oops!

Something went wrong. Please try again later.

  • महामुंबई
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • औरंगाबाद
    • नागपूर
  • मानिनी
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
  • राजकारण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • वाणी संतांची
    • दिन विशेष
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • वेब स्टोरीज
  • फोटोगॅलरी
  • व्हिडिओ
  • आणखी
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • अर्थजगत
    • क्राइम
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • भक्ती
    • सणवार
Sign in
Welcome!Log into your account
परवलीचा शब्द विसरला
Password recovery
परवलीचा शब्द परत मिळवा
शोधा
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
Thursday, March 2, 2023
27 C
Mumbai
Facebook
Instagram
Telegram
Twitter
Youtube
  • महामुंबई
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • औरंगाबाद
    • नागपूर
  • मानिनी
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
  • राजकारण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • वाणी संतांची
    • दिन विशेष
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • वेब स्टोरीज
  • फोटोगॅलरी
  • व्हिडिओ
  • आणखी
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • अर्थजगत
    • क्राइम
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • भक्ती
    • सणवार
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
  • महामुंबई
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • औरंगाबाद
    • नागपूर
  • मानिनी
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
  • राजकारण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • वाणी संतांची
    • दिन विशेष
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • वेब स्टोरीज
  • फोटोगॅलरी
  • व्हिडिओ
  • आणखी
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • अर्थजगत
    • क्राइम
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • भक्ती
    • सणवार
  • Trending :
  • संजय राऊत
  • चित्रा वाघ
  • पोटनिवडणूक निकाल
  • दहावी परीक्षा
  • हक्कभंग
  • जेएनयू नियमावली
घर अर्थजगत महारेराने ४५ बिल्डरांना पाठवल्या कारणे दाखवा नोटीस, प्रकरण काय?

महारेराने ४५ बिल्डरांना पाठवल्या कारणे दाखवा नोटीस, प्रकरण काय?

By
My Mahanagar Team
-
March 2, 2023 10:24 AM  Mumbai
Promoters not complying with the errors are liable to penal action from Maharera

मुंबई – स्थावर संपदा अधिनियम (Real Estate Act 2016) कलम 4(2)(I)(d) अन्वये नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्प व्यवस्थितपणे पूर्ण व्हावा यासाठी, एका नोंदणीक्रमांकाच्या प्रकल्पासाठी एकच बँक खाते असणे बंधनकारक आहे. असे असताना 1781 प्रकल्पांनी त्यांची बँक खाती एकापेक्षा जास्त प्रकल्पांशी संलग्न केल्याची अनियमितता महारेराच्या झाडाझडतीत समोर आली आहे. महारेराने या अनियमिततेची दखल घेतली असून आतापर्यंत अशा 45 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. उर्वरित प्रकल्पांनांही कारणे दाखवा नोटीसा पाठविणे सुरू आहे.

भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून एका प्रकल्पाचे पदनिर्देशित खाते (Designated account) दुसऱ्या प्रकल्पाच्या बँक खात्याशी जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटकाव होईल आणि तसे करता येणार नाही, असे बदल संगणकीय प्रणालीत करण्यात आले आहेत. याशिवाय आता विकासकाने परस्पर खातेबदल करायचा प्रयत्न केल्यास तेही होणार नाही. आता महारेराने नवीन आदेश काढून या बदलासाठी महारेराची पूर्व परवानगी अत्यावश्यक केलेली आहे.

हेही वाचा – विसंगतीमुळे ३१३ मोठे प्रकल्प महारेराच्या रडारवर; पाहणीसाठी विशेष तपासनीसाची नियुक्ती

स्थावर संपदा क्षेत्रात अंगभूत शिस्त निर्माण व्हावी. प्रत्येक घर खरेदीकराराची व या क्षेत्रातील तत्सम गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहावी, स्थावर संपदा क्षेत्राची विश्वासार्हता वाढावी, यासाठी या क्षेत्रात वित्तीय शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी महारेरा समर्पितपणे प्रयत्नशील आहे. त्यासाठीच महारेराने हे सुक्ष्म संनियंत्रण सुरू केलेले आहे.

स्थावर संपदा अधिनियमानुसार एका रेरा नोंदणी क्रमांकासोबत फक्त एकच बँक खाते ठेवणे विकासकाला बंधनकारक आहे. संबंधित प्रकल्पातील नोंदणीपोटी आलेला पैसा फक्त या खात्यात ठेवून त्या प्रकल्पाच्या कामासाठीच तो वापरला जावा. इतरत्र तो कुठेही वळवला जाऊ नये. कारण असे झाल्यास त्याचा विपरीत परिणाम त्या प्रकल्पावर होऊ शकतो.
एवढेच नाही, विकासकाला त्या प्रकल्पातील नोंदणीपोटी आलेल्या पैशातील 70 टक्के पैसेही याच खात्यात ठेवण्याचे बंधन आहे. विकासकाला त्याला हवे तेव्हा मनमानी पध्दतीने या खात्यातून पैसे काढता येत नाहीत.

या प्रकल्पाचे काम करताना, या खात्यातून प्रत्येक टप्प्यावर पैसे काढताना प्रकल्प अभियंता (Project Engineer), प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ (Project Architect) आणि प्रकल्प अन्वेषक (Project Auditor) यांचे प्रकल्प किती पूर्ण झाला, किती बाकी आहे, किती पैशांची गरज आहे याबाबतचे प्रमाणपत्र असल्याशिवाय, त्यांनी तसे प्रमाणित केल्याशिवाय या खात्यातून पैसे काढता येत नाहीत.

हेही वाचा – महारेराचे बंद पडलेले गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी विकासकांच्या स्वयं विनियामक संस्थांचे प्रतिनिधी करणार मध्यस्थी

राज्यात लहान-मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या सूक्ष्म संनियंत्रणासाठी महारेराने पावले उचललेली आहेत. प्रकल्पांशी संबंधित आर्थिक व्यवहारांचे सूक्ष्म संनियंत्रण महारेराने केलेले आहे. विकासकांनी महारेराकडे स्वतः सादर केलेल्या माहितीचा अभ्यास करून महारेराने ही अनियमितता अधोरेखित केलेली आहे. या अनियमिततेची दखल महारेराने घेतलेली असून सर्वांना कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांना प्रत्त्येक प्रकल्पातील एकूण सदनिकांची संख्या , विकलेल्या सदनिकांची संख्या, त्यापोटी आलेले पैसे, बँकेतून काढलेले पैसे याचा सर्व तपशील पुराव्यांसह सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.देण्यात येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांचे म्हणणे समजून घेऊन, पुढील उचित कारवाई करण्यात येईल.

गेल्या आठवड्यात महारेराने 313 प्रकल्पांवर लाल पताका लावून त्यांची अधिक सूक्ष्म तपासणी सुरू केलेली आहे. या सर्व 313 प्रकल्पांनाही कारणे दाखवा नोटीसा यापूर्वीच बजावण्यात आलेल्या आहेत. त्यांची सुक्ष्म छाननी सुरू आहे.

  • टॅग
  • bank account
  • developers
  • Maharera
  • show cause notices

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा

My Mahanagar Team
https://www.mymahanagar.com

संबंधित लेखलेखक पेक्षा अधिक

maharera_mumbai

विसंगतीमुळे ३१३ मोठे प्रकल्प महारेराच्या रडारवर; पाहणीसाठी विशेष तपासनीसाची नियुक्ती

Real estate agents to declare 'transaction details' twice a year

रियल इस्टेट क्षेत्रातील एजंटसना वर्षातून दोनदा जाहीर करावा लागेल ‘व्यवहार तपशील’

Mediation by representatives of self-regulatory bodies of developers to start stalled housing projects of MahaRERA

महारेराचे बंद पडलेले गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी विकासकांच्या स्वयं विनियामक संस्थांचे प्रतिनिधी करणार मध्यस्थी

महारेराकडून 5 वर्षांतील गृहनिर्माण प्रकल्पांची झाडाझडती, 19,539 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा

महारेराने जारी केलेल्या 27 वॉरंटप्रकरणी 20 जानेवारीला होणार लिलाव

Promoters not complying with the errors are liable to penal action from Maharera

त्रुटींची पूर्तता न करणारे प्रवर्तक महारेराकडून दंडनीय कारवाईसाठी पात्र

व्हिडिओ

योगेश कदम यांची भास्कर जाधवांवर खोचक टीका

बाळासाहेब थोरातांची पोटनिवडणूक आणि काँग्रेसमधील दुफळीवर प्रतिक्रिया

प्रचाराच्या वेळेस मविआकडून बिनबुडाचे आरोप, योगेश कदमांचा हल्लाबोल

हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीच.., अंबादास दानवेंची टीका

Advertisement

फोटोगॅलरी

Photo : नोरा फतेहीचं बोल्ड फोटोशूट

झुठीने दिल भी चुरा लिया… श्रद्धा कपूरच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘वीज आंदोलन’

विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘कांदा आंदोलन’

MyMahanagar App Link
Facebook Instagram Twitter Youtube
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
  • Advertise With Us
  • Sitemap
  • Grievance Disclosure
© 2018 AaplaMahanagar