घरमहाराष्ट्रशहीद म्हणजे नक्की कोण, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने व्याख्याच सांगितली

शहीद म्हणजे नक्की कोण, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने व्याख्याच सांगितली

Subscribe

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) त्यांच्या मूळ गावी गेली असताना भाषणाच्या ओघात असे बोलले की बंड फसला असता तर शहीद होण्याची पाळी होती. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी घेतला. तपासे म्हणाले वास्तविक शहीद ही उपमा कोणाला देतात हे कदाचित सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माहीत नसावं.

हेही वाचा – …तर शहीद झालो असतो, एकनाथ शिंदेंची धक्कादायक माहिती

- Advertisement -

लष्करातील जवान जेव्हा देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देतात, देशाच्या दुश्मनांसमोर शरणागती न पत्करता सर्वोच्च बलिदान करतात अशांना शहीद म्हटलं जातं. भारतीय स्वतंत्र लढ्यात ज्यांनी ब्रिटिश पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला व हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली ते शहीद.

देशात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना पिटाळून लावत असताना त्यांच्या प्रति हल्ल्यात झालेल्या गोळीबाराचा सामना करत असताना वीरगती प्राप्त झालेले आमचे पोलीस बांधव हे शहीद. परंतु सत्तेसाठी बंड करायचा व ज्या घराने आपल्याला आसरा दिला, नाव दिले, मोठे केले, अशाच घराला फोडणारे कधीच कोणाच्याही समोर आदर्श होऊ शकत नाही असा टोमणा महेश तपासे यांनी लगावला. त्यांचा बंड यशस्वी ठरो किंवा अपयशी ठरो, इतिहास त्यांना काय म्हणेल हे महाराष्ट्राला माहीतच आहे अशी तीव्र प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – १३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, आठ मंत्री अल्पशिक्षित; नव्या मंत्रिमंडळातील आमदारांची कुंडलीच सादर

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळीनंतर मोठं विधान केलं आहे. आम्ही बंड केल्यानंतर ती लढाई काही खोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. एकीकडे सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर देखील वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असं वाटत होतं. थोडं जरी इकडं तिकडं झालं असतं आणि दगाफटका झाला असता तर शहीदच झालो असतो, अशी धक्कादायक माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -